सांगली – ज्योती मोरे
सांगली यशवंतनगर येथील लोकनायक शिक्षण मंडळाच्या श्रीमती शालिनी रंगनाथ दांडेकर (माध्यमिक व उच्च माध्यमिक )हायस्कूलचा दहावीचा निकाल 97.67टक्के लागला. परिक्षेला एकूण 86 विद्यार्थी बसले होते. 84विद्यार्थी पास झाले. विद्यार्थी व शिक्षकांच्या प्रयत्नातून शाळेच्या निकालाची परंपरा कायम राहिली आहे.
शाळेचे अध्यक्ष श्री अरुण दांडेकर (दादा ), उपाध्यक्ष पै. गौतम पवार तसेच सर्व संचालक मंडळ यांनी गुणवंत विद्यार्थी, शाळेचे मुख्याध्यापक श्री दत्तात्रय विष्णु कुंभार सर, पर्यवेक्षक श्री. विठ्ठल शंकर पाटील सर व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.
चि. विराज प्रवीण सावंत याने 95.40टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक मिळविला. तर चि. वरद सुरेश खराड़े याने 93.80टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक व कु. ओजस्विनी ओंकार माने या विद्यार्थीनीने 93टक्के गुण मिळवून तृतिय क्रमांकावर बाजी मारली.
संस्थेचे सचिव डॉ निलेश पतकी व सहसचिव रामचंद्र देशपांडे यांनी सर्व गुणवंत विद्यार्थी यांचे अभिनंदन केले. त्यांचे पालक व मार्गदर्शक शिक्षक यांचे आभार मानले.