नंदिनी बाबाराव टोहनकर 84 टक्के गुणा सह शाळेतून प्रथम.
प्रावीण्य श्रेणीत 6 तर प्रथम श्रेणीत 8 विद्यार्थी.
नरखेड – अतुल दंडारे
माध्यमिक विद्यालय चांदनी – बर्डी शाळेचा निकाल 94 टक्के. लागला असून यात नंदिनी बाबाराव टोहनकर 84 टक्के गुणा सह शाळेतून प्रथम तर भाग्यश्री प्रकाश थोटे 82.80 टक्के गुणा सह द्वितीय तर पवन देविदास राऊत 79.40 टक्के गुणा सह तृतीय आला आहे.
तर योगिनी नामदेवराव ढोरे 79.20, ओम हुरडे 75.60, अक्षय सोनुले 75.60, हिना ढोकणे 74.60, वैष्णवी पुरी 73, सक्षम पुसदेकर 72.60 गुण प्राप्त करत उत्तीर्ण झाले आहे. परीक्षेला एकूण 16 विद्यार्थी बसले असून 15 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून शाळेचा 94 टक्के निकाल लागला आहे.
यात प्राविण्य श्रेणीत 6 तर प्रथम श्रेणीत 8 विद्यार्थी आले आहे. शाळेच्या वतीने प्रथम द्वितीय तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्याचे अभिनंदन करण्यात आले असून यावेळी जिल्हा परिषद सदात प्रीतम कवरे, शाळेचे पालक-संचालक कुलदिप हिवरकर, महेंद्री चे सरपंच किशोर महल्ले , मुख्याध्यापक महेश शुक्ला ,शिक्षक दिनेश सवाई, शिल्पा ढोकणे, दिपीका काळे उपस्थीत होते. यावेळी विद्यार्थ्याना पुष्गुच्छ देऊन त्यांचे अभिनंद करण्यात आले.