Monday, December 23, 2024
Homeमनोरंजनरवीना टंडनचा लग्नाचा व्हिडिओ झाला व्हायरल…तिचा साधेपणा पाहून लोक म्हणाले…पाहा व्हायरल Video

रवीना टंडनचा लग्नाचा व्हिडिओ झाला व्हायरल…तिचा साधेपणा पाहून लोक म्हणाले…पाहा व्हायरल Video

न्यूज डेस्क : ९० च्या दशकात आपल्या शानदार अभिनयाने तरुणांना वेड लावणारी अभिनेत्री रवीना टंडन तिच्या अभिनयासोबतच अफाट सौंदर्यामुळे चर्चेत असायची. या सुंदर अभिनेत्रीने अक्षय कुमार, सुनील शेट्टी, शाहरुख आणि सलमान खान यांसारख्या बॉलिवूडच्या सर्व टॉप स्टार्ससोबत पडद्यावर रोमान्स केला आहे. आपल्या करिअरच्या शिखरावर असताना, रवीनाने चित्रपट वितरक अनिल थडानीशी लग्न केले, तेव्हा लाखो हृदये तोडल्या गेली. अनेक वर्षांनंतर रवीनाच्या आता तिच्या लग्नाचा एक सुंदर व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. व्हिडिओमध्ये रवीना खूपच सुंदर दिसत आहे.

अनिल आणि रवीना यांचा विवाह उदयपूरच्या जग मंदिर पॅलेसमध्ये सिंधी आणि पंजाबी रितीरिवाजांनी झाला. रिपोर्ट्सनुसार, रवीना टंडन 100 वर्ष जुन्या शाही डोलीत बसून लग्नासाठी मंडपात आली होती. इंस्टाग्रामवर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये रवीना लाल आणि सोनेरी रंगाच्या लेहेंग्यात नववधूच्या भूमिकेत दिसत आहे. रवीना तिच्या लग्नात अप्सरासारखी सुंदर दिसत होती. त्याचवेळी अनिल थडानी ऑफ व्हाइट शेरवानी परिधान करताना दिसत आहे. रवीनाला पाहिल्यानंतर लोक तिला खरी नवरी म्हणत आहे. अशी कमेंट करत आहेत. ना कुठलाही भारी मेकअप, ना कुठला अतिरिक्त ड्रामा, यानंतरही अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे.

फेब्रुवारी 2004 मध्ये रवीना टंडन आणि अनिल थडानी यांनी मोठ्या थाटामाटात लग्न केले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मेवाडची राणी ज्या डोलीत बसायची त्या डोलीत रवीना बसली होती.तर तिने परिधान केलेला लग्नाचा ड्रेस तिच्या आईचा लग्नाचा ड्रेस होता, जो दिल्लीतील एका डिझायनरने तयार केला होता. लग्नानंतर ती तिच्या कौटुंबिक जीवनात अधिक व्यस्त झाली. आरण्यक या वेब सीरिजमध्ये तो अखेरची पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसली होती. ज्यासाठी त्याचे खूप कौतुक झाले होते.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: