सांगली – ज्योती मोरे
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म अहमदनगर तालुक्यातील चौंडी येथे झाल्याने या तालुक्याचे नाव बदलून ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत होती.
त्यानुसार शिंदे फडणवीस सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने सदर नाव बदलण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सदर निर्णयाचे स्वागत करत, आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज जाहीर आभार मानले आहेत.