वाडेगाव : वाडेगाव पोलीस चौकी अंतर्गत येत असलेल्या बाळापूर पातूर रस्त्यावर जागेश्वर विदयलाय जवळ मंगळवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास ट्रकची प्रवासी आटोला जबर धडक लागून अपघात झाल्याची घटना घडली आहे.
वाडेगाव पातूर रोडवरील प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर पातूर कडून वाडेगाव कडे येत असलेला आयशर ट्रक एम एच ४० एक के ४४७४क्रमांक असलेला तर वाडेगाव कडून सस्ती कडे जात असलेला ऑटो एम एच ३० पी ६७६५ ला जोरदार धडक दिल्याने ऑटो पलटी झाला त्यामुळे ऑटो मधे जवळपास दहा प्रवासी प्रवास करीत असल्याचे बोलले जात होते तर अपघात होताच नागरिकांनी धावपळ करून पोलिस कर्मचारी यांचे सहकार्याने अपघातग्रस्तांना तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये हलविले जखमींना प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी अकोला येथे रुग्णवाहिकेतून हलविण्यात आले.
जखमी मध्ये महीला तसेच पुरुषांचा समावेश असल्याचे बोलले जात होते तर चार प्रवाशी गंभीर जखमी असल्याची माहिती मिळाली आहे.प्रवासी मध्ये ऍपे अनिल शामराव सरदार वय ३७,लिलाबाई रमेश अंभोरे वय६० रा सस्ती,कोमल संदिप अंभोरे वय१८ रा सस्ती,कु शामल अंभोरे वय१८ रा सस्ती,स्वाती प्रवीण इंगळे रा खामखेड ता बाळापूर,साहिल इंगळे वय११, अंजली इंगळे वय४,दोन महिलांना जबर मार लागल्याने त्यांना अकोला येथे उपचार साठी पाठविण्यात आले आहे.पुढील तपास वाडेगाव पोलीस चौकी करीत आहे..
अपघाताची माहीती मिळताच आमदार नितीन देशमुख जख्मी झालेल्या रुग्नाना काही मदत लागल्यास या साठी जिल्हा रुग्णालयात जाऊन भेट घेतली व जख्मींच्या परिवारातील लोकांनाची ही भेट घेतली.