नरखेड – अतुल दंढारे
जि.प.स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्र, काटोल येथील विद्यार्थिनी कु.स्वर्णा महादेव कोटजावळे हिची मुंबई पोलीस दलात ‘पोलीस शिपाई’ पदावर निवड झाल्याबद्दल जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा (आय ए एस) यांचे शुभहस्ते सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी जि.प.कृषी सभापती प्रविण जोध, जि.प.सदस्य सलील देशमुख,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा गौरकर,प.स.सभापती संजय डांगोरे, उपसभापती निशिकांत नागमोते, शिक्षणाधिकारी (प्राथ)रोहिणी कुंभार, गट विकास अधिकारी संजय पाटील,कार्यकारी अभियंता राकेश वाघमारे,गटशिक्षणाधिकारी नरेश भोयर प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी कृषी सभापती प्रविण जोध म्हणाले की, आपल्या ग्रामीण भागात अद्यावत अभ्यासिका उभारली ही निश्चितच गौरवास्पद बाब असून याकरिता सलिल देशमुख यांनी मानव विकास विभागाकडे पाठपुरावा केलेला आहे.या अभ्यासिकेत मिळणाऱ्या सुविधेमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धा परिक्षेकडे आकर्षिला जात आहे.भविष्यात या अभ्यास केंद्रातून अनेक अधिकारी घडतील यात तिळमात्र शंका नाही.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्र समन्वयक एकनाथ खजुरीया , संचालन उपक्रम संयोजक राजेंद्र टेकाडे तर आभार प्रदर्शन सुलभक कपिल आंबूडारे यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता संगणक ऑपरेटर सतिश बागडे, परिचारिका अनुसया रेवतकर, सुरक्षा रक्षक रविंद्र डाखोळे यांनी अथक परिश्रम घेतले.
जि.प.स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्रात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता राबवित असलेले उपक्रम कौतुकास्पद आहे.काटोल-नरखेड भागातील तरुणांना अधिकारी बनण्यासाठी ही अभ्यासिका आशेचे किरण आहे.
सलील देशमुख
सदस्य, जि.प.नागपूर