वाशीम : मानोरा पोलीस स्टेशन चे पोलीस हवालदार संजय राठोड ह्यांना 3000 रुपयांची लाच स्वीकारताना वाशीम लाचलुचपतविरोधी पथकाने रंगेहात पकडले आहे. वाशिम चे DYSP गजानन शेळके, PI भोसले व पथकाची कारवाई, 4 महिन्यात वाशिम जिल्ह्यातील 4 पोलीस स्टेशन मध्ये लाचलुचपत विभागाची कारवाई, अनसिंग, रिसोड, कारंजा व आता मानोरा पोलीस स्टेशन मध्ये यशस्वी कारवाईने जिल्हा पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे…
संजय कनिराम राठोड वय 53 वर्ष असे पकडण्यात आलेल्या पोलीस हवालदाराचे नाव असून त्याचे पद नाईक पोलिस कॉन्स्टेबल बक्कल नं.772 पोस्टे मानोरा जि.वाशिम येथे कार्यरत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, यातील 27 वर्षीय तक्रारदार यांचेवर व त्यांचे वडिलांवर दिनांक 23/04/23 रोजी पोस्टे मानोरा येथे कलम 324 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल झालेला असून सदर गुन्ह्यामध्ये अटक न करता जमानत देण्याकामी आलोसे यांनी फि यांचेकडे 3000/- रू. ची मागणी केली होती दि.18/05/23 रोजी प्रत्यक्ष पडताळणी केली असता आलोसे यांनी 3000/- रु ची मागणी करून स्विकारण्यास तयारी दर्शवली असल्याने आजरोजीच प्रत्यक्ष सापळा कारवाई पोस्टे मानोरा च्या परिसरात आयोजित केली असता आलोसे यांनी फिर्यादी यांच्याकडून लाचेचे 3000/-रु स्वीकारले वरून त्यांना तात्काळ ताब्यात घेण्यात आले आहे. संजय राठोड यांचे विरुद्ध पोस्ट मानोरा येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सक्षम अधिकारी
मा.पोलीस अधीक्षक सा. वाशिम
सापळा व तपास अधिकारी
श्री. महेश भोसले
पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. वाशिम.
9028200444
पर्यवेक्षण अधिकारी
श्री.गजानन शेळके पोलीस उपअधीक्षक
ला.प्र.वि. वाशिम.
सापळा कार्यवाही पथक
श्री.गजानन शेळके पोलीस उपअधीक्षक, महेश भोसले पोलीस निरीक्षक पोहवा विनोद मार्कंडे, नितीन टवलारकार, आसिफ शेख विनोद अवगळे , दुर्गादास जाधव.
मार्गदर्शन –
१) मा. श्री.मारोती जगताप, पोलीस अधीक्षक ,
२) मा.श्री.अरुण सावंत, अप्पर पोलीस अधीक्षक,
3) मा. श्री देविदास घेवारे,अप्पर पोलीस अधीक्षक,
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परिक्षेत्र, अमरावती.