माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी पक्षाचा दुपट्टा टाकून पक्षात केले स्वागत…
अहेरी – मिलींद खोंड
अहेरी तालुक्यातील वेलगुर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सक्रिय कार्यकर्ता माजी पंचायत समिती सदस्य आत्माराम गदेकर यांनी आपल्या पक्षाला राम राम ठोकत,भारत राष्ट्र समितीचे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष व माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या कामावर विश्वास टाकत भारत राष्ट्र समिती या पक्षामध्ये प्रवेश केले.
यावेळी माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी आत्माराम गदेकर यांचा पक्षाचा दुपट्टा टाकून स्वागत केले. आत्माराम गदेकर यांचा बी.आर.एस.पक्ष प्रवेशामुळे वेलगुर सह परिसरातील गावांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नुकसान होण्याची शक्यता आहे.आत्माराम गदेकर हे ज्या पक्षात राहतात त्या पक्षात सक्रिय राहून व पक्ष वाढीसाठी काम करीत असतात.
आत्माराम गदेकर हे सर्वपरिचित चेहरा असून वेलगुर गावासह परिसरातील गावांमध्ये त्यांच्या दांडगा जनसंपर्क आहे. पक्ष प्रवेश वेळी माजी जि.प.सदस्य संजयभाऊ चरडुके,वेलगुर उपसरपंच उमेश मोहूर्ले,आलापल्ली माजी सरपंच विजय कुसनाके,जुलेख शेख,प्रवीण रेषे,विनोद कावेरी सह आविस व भारत राष्ट्र समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.