Monday, December 23, 2024
Homeगुन्हेगारीNCB आणि नौदलाची केरळमध्ये मोठी कारवाई...कोची किनारपट्टीवर १२ हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज...

NCB आणि नौदलाची केरळमध्ये मोठी कारवाई…कोची किनारपट्टीवर १२ हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त…

केरळ : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) आणि नौदलाने शनिवारी केरळच्या कोची किनारपट्टीवर 12,000 कोटी रुपयांच्या 2,500 किलो ड्रग्जची खेप जप्त केली. एजन्सीचा दावा आहे की ही भारतातील आतापर्यंतची सर्वात मोठी ड्रग कन्साइनमेंट आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ड्रग्ज एजन्सी आणि भारतीय नौदलाने केलेल्या संयुक्त छाप्यात एका पाकिस्तानी नागरिकालाही ताब्यात घेण्यात आले आहे. अफगाणिस्तानातून समुद्रमार्गे भारतात होणाऱ्या अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधातील मोहीम ‘ऑपरेशन समुद्रगुप्त’ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.

एनसीबीनुसार, मेथॅम्फेटामाइनला ‘डेथ क्रिसेंट’ असेही म्हणतात. भारतीय बाजारपेठेत त्याची किंमत सुमारे 12,000 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. भारतीय एजन्सीने ड्रग्ज घेऊन जाणारे ‘मदर शिप’ पकडण्याची ही पहिलीच वेळ आहे.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: