Viral Video : अमेठीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये सपा आमदार राकेश प्रताप सिंह हे भाजपच्या नगरपालिकेच्या उमेदवार रश्मी सिंह यांचे पती दीपक सिंह यांना पोलिसांच्या उपस्थितीत मारहाण करताना दिसत आहेत. आणि पोलीस मूक प्रेक्षक बनून बघत आहेत. ही घटना पोलीस ठाण्याच्या आत घडल्यानंतर पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत.
हे प्रकरण गौरीगंज पोलीस ठाण्याचे आहे. यावेळी उपस्थित लोकांनी मध्यस्थी करत दीपक सिंह यांची आमदाराच्या तावडीतून भाजप नेत्याची सुटका केली. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर भाजप सपा आमदाराबाबत आक्रमक झाली आहे. निवडणुकीच्या वादातून दोघांमध्ये वाद झाल्याचे बोलले जात आहे. या आमदारावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी भाजपने अखिलेश यादव यांच्याकडे केली आहे.
या घटनेनंतर भाजपचे जिल्हाध्यक्ष पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह गौरीगंज पोलिस ठाण्यात पोहोचले. पोलीस प्रशासनावर संताप व्यक्त करत त्यांनी आमदार राकेश प्रताप सिंह यांना गुंड म्हटले.