Tuesday, November 26, 2024
Homeसामाजिकअमरावती | स्वाभिमान नगरात वणनेस मुक्तांगण फाउंडेशन तर्फे आरोग्य शिबिर व मोफत...

अमरावती | स्वाभिमान नगरात वणनेस मुक्तांगण फाउंडेशन तर्फे आरोग्य शिबिर व मोफत औषधांचे वाटप…

अमरावती : वणानेस मुक्तांगण मल्टिपर्पज फाउंडेनन अमरावती, वनबंधू सोसायटी, महिला आधाडी अमरावती चॅप्टर व माहेश्वरी महिला समाज अमरावती यांचा संयुक्त विद्यमाने शहरातील पार्वती नगर रेल्वे फाटकाच्या मागील स्वाभिमान नगर येथे रविवारी दिनांक ०६ मे रोजी, सकाळी नऊ ते दुपारी दोन असे मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते, शिबिरामध्ये लहान मुलांच्या प्राथमिक आरोग्य तपासणी पासून सुरुवात करून स्थानिक स्त्रियांच्या आरोग्याशी निगडित समस्या तसेच इतर नागरिकांच्या आरोग्याची मोफत तपासणी करून त्यावर योग्य त्या औषधांचे मोफत वाटप करण्यात आले.

वणानेस मुक्तांगण हि संस्था याच झोपडपट्टी भागात राहणाऱ्या १ ते १० वी च्या ११८ विद्यार्थ्यांना गेल्या तीन वर्षांहून अधिक काळापासून मोफत शिकवणी आणि सोबतच त्यांचे छंद जोपासून व्यक्तिमत्व विकासाचे धडे देण्याचे काम करत आहे, विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर उंचवण्यासाठी संस्थेचे सेवाभावी सदस्य आपल्या व्यस्ततेतून शनिवार व रविवार वेळ काढून मुलांचे पालकत्व सांभाळत आहेत.

विद्यार्थी -पालकांच्या आरोग्याचे प्राथमिक हीत लक्षात घेऊन वणनेस मुक्तांगण घ्या टीमने यावेळी आपल्या खुल्या शाळेच्या प्रांगणातच मोफत आरोग्य तपासणी आणि सोबतच औषधांचे मोफत वाटप शिबीर आयोजित केले होते यामध्ये त्यांना बालरोगतज्ञ डॉ ऋषिकेश नागलकर, त्वचारोगतज्ज्ञ डॉ रोहिणी चव्हाण आणि स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून डॉ रश्मी नागलकर लाभले होते, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी.‌वणनेस मुक्तांगणचे अध्यक्ष पंकज हादवे,, सदस्य सुमित मोंढे, ऋचीका मोहोकार, कोषाध्यक्ष राहुल बेलसरे, ऋतुजा जिरापुरे, अश्विनी राठोड, जयेश गुल्हाने,, सौ रंजना तायडे यांनी हे आरोग्य शिबीर यशस्वीपणे पार पाडण्यासाठी काम केले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता जेसीआय अमरावतीच्या प्रभा झंवर, जयश्री लोहिया, आशा लढ्ढा, उषा करवा, किरण मुंदडा, अरुणा वोहरा आणि त्यांच्या इतर सहकारींचे अमूल्य मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले,

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: