जि.प.अभ्यास केंद्रात स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन…

0
367
Guidance for Competitive Examination

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक दिपक काकडे यांचे मार्गदर्शन

नरखेड – अतुल दंढारे

जि.प.स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व अभ्यास केंद्र, काटोल येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक दिपक काकडे यांनी यूपीएससी व एमपीएससी परिक्षेबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांच्या प्रश्नाना मनसोक्त उत्तरे दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी संतोष सोनटक्के तर प्रमुख अतिथी म्हणून केंद्रसमन्वयक एकनाथ खजुरीया व उपक्रम संयोजक राजेंद्र टेकाडे प्रामुख्याने उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेचे व्यवस्थापन करतांना वास्तविकता लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.तुम्ही अभ्यासिकेत किती वेळ असता व प्रत्येक्षात किती वेळ अभ्यास करता यात तफावत असते.कमीत कमी दररोज आठ तास अभ्यास करायलाच हवा.परीक्षेचे शेवटचा काळात ज्या एकाग्रतेने अभ्यास करण्यात येतो तीच एकाग्रता वर्षभर कायम राहिल्यास यश मिळण्यास मदत होईल असेल प्रतिपादन दिपक काकडे यांनी केले.

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांत स्वयंशिस्त आवश्यक आहे.अलीकडे स्पर्धा परीक्षेचे बाजारीकरण मोठ्या प्रमाणात होत आहे.विद्यार्थ्यांना यापासून दूर राहून स्वयंप्रेरित व्हावे.प्रशासनाला ‘पुस्तकी किडा’ असणारा विद्यार्थी नको तर उत्तम व्यवस्थापन व योग्य-अचूक निर्णय घेणारा विद्यार्थी हवा आहे.म्हणून आपले व्यक्तिमत्त्व सर्वांगीण दृष्टीकोनातून फुलविण्याचा प्रयत्न करा.असा संदेश विद्यार्थ्यांना दिला.

आपल्या विदर्भात स्पर्धा परीक्षेची जनजागृती कमी प्रमाणात असल्यामुळे आपल्या भागातील विद्यार्थी ‘प्रशासकीय अधिकारी’ कमी बनतात.यातुलनेत पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडा मधील विद्यार्थी प्रचंड मेहनत घेतात म्हणून त्या भागातील विद्यार्थी प्रशासनात अधिकारी म्हणून आहे अशी माहिती एका प्रश्नाचे उत्तर देतांना काकडे यांनी दिली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक एकनाथ खजुरीया, संचालन कपिल आंबूडारे तर आभार प्रदर्शन रोशन धोत्रे यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता संगणक परिचालक सतिश बागडे, परिचारिका अनुसया रेवतकर, सुरक्षा रक्षक प्रल्हाद पडोळे आदींनी सहकार्य केले.