न्युज डेस्क – खलिस्तान समर्थक अमृतपाल याने आत्मसमर्पण केल्याची बातमी अनेक माध्यमांवर आल्यात, मात्र अमृतपाल सिंगच्या अटकेबाबत पंजाब पोलिसांचे आयजी सुखचैन सिंग गिल माहिती देतात की, अमृतपालच्या विरोधात एनएसए (NSA) अंतर्गत वॉरंट जारी करण्यात आले होते, त्यानंतर त्याला एनएसए (NSA) अंतर्गत अटक करण्यात आली होती. आयजी म्हणाले, “आम्ही अमृतपाल सिंगला सकाळी 6:45 वाजता ऑपरेशन चालवून अटक केली. ते म्हणाले की या संपूर्ण ऑपरेशन दरम्यान पंजाबच्या लोकांनी शांतता, कायदा आणि सुव्यवस्था (Law and order) राखली, ज्यासाठी आम्ही त्यांचे आभार मानतो. यासोबतच आयजी पंजाबमधील जनतेला शांतता राखण्याचे आवाहन केले.
पंजाब पोलिसांचे आयजी गिल म्हणाले की आमच्याकडे विशिष्ट माहिती होती, ज्यामध्ये आम्हाला माहित होते की तो रोडे गावातील गुरुद्वारामध्ये उपस्थित होता. गुरुद्वारा साहिबची प्रतिष्ठा लक्षात घेऊन आम्ही त्याला अटक केली आहे. त्याला अटक केल्यानंतर त्याची रवानगी आसाममधील दिब्रुगड येथे करण्यात आली आहे. अनेक महिन्यांपासून फरार असलेल्या अमृतपाल सिंग याला पंजाब पोलिसांनी आज मोगा जिल्ह्यातून अटक केली आहे. त्यानंतर त्याची रवानगी दिब्रुगड कारागृहात करण्यात आली आहे.
अमृतपालवर कडक कारवाई करत त्याच्यावर एनएसएही लावण्यात आले आहे. पंजाब पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा सतत त्याच्या शोधात गुंतल्या होत्या. अमृतपालला पकडण्यासाठी नेपाळ सीमेपर्यंत देशभरात ऑपरेशन करण्यात आले. त्याचवेळी पंजाब पोलिसांनी ट्विट करून अमृतपाल सिंगच्या अटकेची माहिती दिली आहे.