हेमंत जाधव
बुलढाणा जिल्हातील सुप्रसिद्ध घटमांडणी ला 350 वर्षांची परंपरा आहे श्री चंद्रभान महाराज यांनी घटमंडणी ला सुरवात केली होती या मध्ये देशातील येणाऱ्या वर्षाच्या अर्थकारण, राजकारण, हवामान, रोगराई आदी विषयांवर भाकीत करण्यात येते या भाकितावर शेतकरीच नव्हे तर बियाणे कंपन्यांचे ही लक्ष लागून असते म्हणून परिसरातीलच नव्हे तर दुरून दुरून शेतकरी बांधव भाकीत ऐकण्यासाठी जमतात.
भेंडवळ या गावा मध्ये अक्षय तृतीयेच्या रात्री वाघ महाराजांच्या शेतामध्ये घटमंडणी केली असून आज सकाळी 6 वा भाकीत आज सकाळी श्री पुंजाजी महाराज आणि सारंधार महाराज यांनी वर्तविली आहे या मध्ये पाऊसाची परिस्थिती जून व जुलै महिन्यामध्ये कमी पाऊस राहील, ऑगस्टमध्ये प्रचंड पाऊस असून अतिवृष्टी राहील, पुन्हा सप्टेंबर मध्ये कमी पाऊस राहील, गहू, तांदूळ, ज्वारी आदी पिकांना अवकाळी पावसाचा फटका बसेल. राजकीय परिस्थिती राजा कायम राहील म्हणजेच देशाचे पंतप्रधान श्री मोदी हे कायम राहतील,
12 वर्षात पहिल्यांदाच घटमांडणी मध्ये विंचू निघाल्याने देशात रोगराई चे वातावरण राहील. या घटमांडणी च्या भाकितावर शेतकरी वर्गाचा प्रचंड विश्वास आहे भाकिता वरून शेतकरी आपल्या पीक पेरणी चे नियोजण करत असतात.