Sunday, December 22, 2024
HomeSocial Trending'हा' चित्रपटाचा सीन नव्हे…तर सुटका करण्यासाठी ड्रायव्हरने केला जीवघेणा स्टंट...आनंद महिंद्रा यांनी...

‘हा’ चित्रपटाचा सीन नव्हे…तर सुटका करण्यासाठी ड्रायव्हरने केला जीवघेणा स्टंट…आनंद महिंद्रा यांनी Video केला शेयर…

हॉलीवूडच्या अनेक चित्रपटात डोळ्यावर विस्वास बसणार नाहीत असे सीन शूट करतात. तर आता उद्योगपती आनंद महिंद्रा यांनाही आश्चर्यचकित करणारा Video आपल्या Twitter पेजला शेयर केला. यामध्ये पोलीस गुन्हेगारांचा पाठलाग करतानाचा खतरनाक स्टंट आहे. एखाद्या चित्रपटातील दृश्याप्रमाणे दिसणारी एक SUV पोलिसांच्या कारमधून आश्चर्यकारकपणे पळून जात असल्याचे दाखवणाऱ्या क्लिप आहे.

क्लिप शेअर करताना आनंद महिंद्रा यांनी लिहिले, “नाही, हे नवीन SUV साठी आमच्या चाचणी पॅरामीटर्सचा भाग होणार नाही!”

व्हिडिओमध्ये एक मर्सिडीज जी-वॅगन पाठलाग करताना कार ट्रेलरवर चढतांना दिसत आहे. ट्रेलरच्या मागील बाजूस आदळल्याने जी-वॅगन रस्त्याच्या दुसर्या वे-वर उडून जाते आणि सुरक्षितपणे रोडवर थांबते. जणू काही घडलेच नाही, पोलिसांचे वाहन दुभाजकावर अडकले असताना जी-वॅगन पुन्हा वेगाने धावताना दिसते.

अनेक वापरकर्त्यांना व्हिडिओच्या सत्यतेवर शंका घेत आहे आणि अनेकांना व्हिडिओ पाहून आश्चर्य वाटले. एका यूजरने कमेंट केली की, “हा नक्कीच सिंघम 3 मधील सीन नाही?” दुसऱ्या युजरने लिहिले की, “सर हा खरा व्हिडिओ आहे का?” तिसऱ्या युजरने लिहिले की, “मला बॉलीवूडला हे करताना पाहायला आवडेल.”

पत्रकार मोहम्मद जुबेर यांनी व्हिडिओ बनवण्यासाठी केलेल्या एनिमेशनचे स्पष्टीकरण देणारी YouTube व्हिडिओची लिंक शेअर केली आहे. क्रिएटरने 2020 मध्ये रस्त्यावरील एका पुलावरून ट्रॅफिक व्हिज्युअल कॅप्चर करण्यास सुरुवात केली आणि एनिमेशन वापरून, क्रिएटरने पोलिस कार, ट्रेलर आणि SUV सह संपूर्ण पोलिसांचा पाठलाग तयार केला.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: