स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या कडून पालकमंत्र्यांना शोधून देनाऱ्यास ५१ रुपयांचा बक्षीस.
हेमंत जाधव
शिंदे सरकार स्थापन होऊन जवळपास दहा महिने झाले व पालकमंत्र्यांच्या नियुक्ती होऊन नऊ महिने झाले या काळात अतिवृष्टी तर कुठे चक्रीवादळामुळे शेतकरी त्रस्त असताना अद्यापही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्ह्याचा दौरा केलेला नाही किंवा शेतकऱ्यांचा संपून सुद्धा केलेलं नाही त्यामुळे संतप्त स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी जिल्ह्यातील अनेक गावात पालकमंत्री बेपत्ता झाल्याचे पोस्टर झळकवले आहेत व पालकमंत्र्यांना शोधून देणारच 51 रुपयाचा बक्षीस सुद्धा जाहीर केलेला आहे जागोजागी अनेक ठिकाणी मुख्य महामार्गावर तर गावातील पान टपऱ्यांवर हे पोस्टर झळकत आहेत. नागरिकही हे पोस्टर बघून कुतूहल व्यक्त करत आहेत.