सांगली – ज्योती मोरे
पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या फळ मार्केट पैकी एक असणाऱ्या विष्णू अण्णा पाटील फळ मार्केटमध्ये यावर्षी अक्षय तृतीयाच्या पार्श्वभूमीवर कोकणातील आंब्याच्या तुलनेने कर्नाटकातील आंब्यांची मोठ्या प्रमाणावर आवक झाली असून देवगड रत्नागिरीच्या मानाने आंबा स्वस्तही असल्याने ग्राहकांचा कल या आंब्याकडे असल्याची आंबा व्यापारी प्रकाश मदने यांनी सांगितले.
दरम्यान, मे महिन्यात कोकणातील आंब्याची आवक मोठ्या प्रमाणावर होईल. त्यावेळी हा आंबा सर्वसामान्य माणसांच्या आवाक्यात येईल, असेही ते म्हणाले.