ट्विटरने आज देशातील नव्हे जगातील मोठ्या स्टारचे ब्लू टिक्स काढून टाकले आहेत, यामध्ये भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आणि अभिनेता शाहरुख खान यांसारख्या अनेक लोकप्रिय व्यक्तींच्या ब्लू टिक्स काढून टाकले आहेत. तर यावर सुपरस्टार अमिताभ बच्चनने Twitter ला उद्देशून भोजपुरी भाषेत एक ट्वीट केले आहे जे सध्या चर्चेत आहे. काय आहेत ते ट्वीट पाहूया…
अमिताभ बच्चन त्यांच्या पेजवर म्हणाले…ए ट्विटर भाऊ! तुम्ही ऐकत आहात का? आता आम्ही पैसे भरलेत…म्हणून आमच्या नावासमोर निळे कमळ ✔️ नाही, परत लावा भाऊ, म्हणजे लोकांना कळेल की आम्ही आहोत – हात तर जोडत आहो आम्ही. आता काय, पाय जोडावे लागतील का ??…अमिताभ बच्चन..
यावर अनेकांच्या प्रतिक्रिया व मिम्स येत आहेत…एकजण म्हणतो, मस्कवा सर्वांसोबत चिड़िया उड़ खेळत आहे मी…आम्ही एक पैसाही देणार नाही…तर दुसरा म्हणतो, हे असे आहे…. आता तुम्हालाही रांगेत उभे राहून वाट पहावी लागेल. पूर्वी तुम्ही जिथे उभे राहायचे तिथून लाईन सुरू व्हायची…
ट्विटरचे नवीन मालक इलॉन मस्क यांनी ट्विटर ब्लूसाठी किंमत देण्याबद्दल बोलले तेव्हा अनेक वापरकर्त्यांनी त्यांना शिवीगाळही केली होती. वास्तविक, इलॉन मस्कने 44 बिलियन डॉलर (सुमारे 3,36,910 कोटी रुपये) खर्च करून ट्विटर स्वताच्या नावावर केले. तेव्हापासून कंपनी आर्थिक संकटाचा सामना करत होती. आणि यासाठी मस्कला ट्विटरवर सशुल्क सेवा सुरू करावी लागली.