पातूर – निशांत गवई
शेलु बु ता . जि. वाशिम येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची132 वि जयंती मोठ्या थाटा माटत साजरी करण्यात आली . या जयंती चे विशेष म्हणजे की वाशिम जिल्हा निर्मिती दिनांक 1 जुलै 1998 ला झाली असल्याने जिल्ह्याला 25 वर्षे पूर्ण होत असल्याने स्मशानभूमीत25000 वृक्ष लागवडीस सुरुवात करून भर उन्हाळ्यात वृक्ष लागवड करून सदर सर्व वृक्ष जगविण्याची हमी सर्व गावकरी मंडळी ने घेतली.
सदर वृक्ष लागवड ही भारत वृक्ष क्रांतीचे जनक ए.एस. नाथन यांच्या मार्गदर्शनाखाली स्वस्तिक पॅटर्न नुसार विविध प्रजातीचे वृक्ष लागवड करण्यात आली त्या साठी गावातील सरपंच सौ. तृष्णा देवानंद गुंठे यांनी पुढाकार घेऊन एक नवीन आदर्श समाजा समोर ठेवला आहे.
तत्पूर्वी गावातील बोधिसत्व बुद्ध विहार येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सर्व गावकरी मिळून वंदना घेण्यात आली . काही लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला त्यात विशेष म्हणजे गावातील एक मुलगी कु नेहा शामराव उंदरे ही एम पी एस सी चा अभ्यास करत आहे तिला गावच्या उपसरपंच हिने अभ्यास करण्या करिता स्पर्धा परीक्षा ची पुस्तक भेट म्हणून दिले आणि तिला अभ्यास करण्याकरिता व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेलं कार्य करण्या करिता तिला खूप खूप शुभेच्छा दिल्या.. सदर कार्यक्रम चे सूत्र संचालन धम्मपाल उंदरे प्रस्ताविक प्रा. गजानन उंदरे व आभार प्रदर्शन राहुल उंदरे यांनी केले.
त्यानंतर गावकरी यांना भोजन देण्यात आले व गावातून सर्व धर्म समभाव याचे दर्शन घडवत सर्व जाती पाती बाजूला ठेवून गावातून भव्य दिव्य रॅली काढण्यात आली रॅली चे इतर समाजातील नागरिक यांनी प्रतिमा चे पूजन केले. शेलू बु या गावात सर्व राष्ट्रीय सन उत्सव एकत्रित करत असतात. त्यामुळे च कि काय ह्या गावातील सेवा सहकारी सोसायटी,असो वा ग्रामपंचायत निवडणूक असो ह्या सर्व निवडणूक बिनविरोध होतात… सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावातील आदर्श व्यक्तीत्व मेजर देवानंद गुठ्ठे, तंटामुक्त गावं समितीचे अध्यक्ष विठ्ठल दमगिर सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक व सर्व नागरिक यांनी सहकार्य केले.