वुत्तसेंवा -अतुल नवघरे
लाखपुरी :०९ मुर्तिजापूर तालुक्यातील लाखपुरी येथे शुक्रवार दिनांक ७ एप्रिल रोजी भर दुपारी व रात्री १० ते २ सुमारास गारासह अवकाळी पाऊस कोसळल्याने नागरिकांची दाणादाण उडालीच परंतु लाखपुरी व लाखपुरी सर्कल मधील अनेक गावात व ग्रामीण भागात शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. वादळ वाऱ्यासह आलेल्या या पावसाने अनेक घरावरील टीन पत्रे उडून अनेकांचे संसार उघड्यावर आले. तसेच अनेकांच्या घरात पावसाचे पाणी शिरल्याने अन्नधान्य साहित्य नुकसान झाले आहे. प्रचंड वेगाने वारे वाहू लागल्याने चक्क झाडे उघडून पडली होती. काही ठिकाणी विजेची खांबही कोसळल्याने घटना ग्रामीण भागात उघडीस आली आहे.
तर लाखपुरी येथील अयुब खा सर्वर खा , रोशन खा दुल्हे खा ,ममुलाबी हकीम शाह , मुख्तार खा साहेब खा यांच्या घराची संपूर्ण भिंत पडली , आवेशा शाहा यांच्या शेतात असलेल्या गहू या पिकाचे नुकसान झाले , माधुरी अनिल हसले यांच्या शेतात असलेल्या २ एक्कर कांदा या पिकाचे नुकसान झाले आहे . शुक्रवारी लाखपुरी सह काही भागात गारपीट सर तुफान पाऊस कोसळला , लाखपुरी सह लाखपुरी सर्कल मधील अनेक गावात लाईट बंद होती. कांदा , गहू , पपई , लिंबु पपई पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान. अनेक वेळा पिकाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होते. शेतकऱ्याच्या बांधावर येऊन सर्वे सुद्धा होतो . मोबदला मिळण्याचे आश्वासन सुद्धा दिल्या जाते .परंतु मदत मिळत नाही शेवटी शेतकऱ्याच्या पदरी निराशाच येते. परंतु वस्तुस्थिती अशी आहे . बहुतांशी शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप पैसे आले नाही . त्यामुळे शेतकऱ्याचा विश्वास राहणार असे पाऊल शासनाने उचलले पाहिजे नुकसानीचा मोबदला तात्काळ दिला गेला पाहिजे .आता तरी महसूल विभागाकडून पाहणी करून मदत देण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
लाखपुरी सह लाखपुरी सर्कल मधील कांदा , गहु , पपई , लिंबू पिकांचे नुकसान व घराच्या भिंती पडल्या व अनेकच्या घरावरील तिनपत्रे उडून गेले आहे. तरी नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत द्या . (माजी. पंचायत समिती सदस्य लाखपुरी – मिनल नवघरे
७ एप्रिल ल माझ्या घराची भिंत पडली. मला मदत मिळेल का हे मला माहीत नाही. कारण मागील वर्षी सुध्दा गावात लोकांच्या भिंती पडल्या होत्या . प्रशासनाकडून सर्वे करुन गेले मदतीचे आश्वासन दिले पण अद्याप पैसे मिळाले नाही.
(रोशन खा दुल्हे खा ( लाखपूरी )
अवकाळी पावसामुळे माझ्या शेतामधील कांदा पिकाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.व कांदा पुर्ण पणे संडला आहे . तरी शासनाकडून मला मदत देण्यात यावी. (माधुरी हरसुले (शेतकरी लाखपुरी )
लाखपुरी सर्कल मध्ये दरवर्षी शेतकरी हा आपल्या पिकाचा पिक विमा काढतो दरवर्षी शेतकऱ्याचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होवुन देखील मदत मिळत नाही. ज्या शेतकऱ्यांने विमा भरला त्या शेतकऱ्याला सरसकट विमा देण्यात यावा.
( एडवोकेट – दत्तराज देशमुख )