Saturday, September 21, 2024
HomeUncategorizedडिजिटल मीडियाचा दर्जा वाढवण्यासाठी मराठी पत्रकार परिषद सर्व ते सहकार्य - मराठी...

डिजिटल मीडियाचा दर्जा वाढवण्यासाठी मराठी पत्रकार परिषद सर्व ते सहकार्य – मराठी पत्रकार परिषदेचे राज्य उपाध्यक्ष शिवराज काटकर…

सांगली – ज्योती मोरे

यूट्यूब चॅनल्सच्या पत्रकारांनी कोणत्याही वादात न अडकता स्वतःचा दर्जा आणि व्ह्यूवज वाढवण्यावर भर देऊन चांगल्या प्रकारची पत्रकारिता करण्याला प्राधान्य द्यावं यासाठी युट्युब चॅनेल आणि डिजिटल मीडियाला भविष्यात चांगल्या प्रकारचे काम करण्यासाठी जी काही मदत लागेल ती मराठी पत्रकार परिषद करेल असा विश्वास, व्हाईट हाऊस इथं झालेल्या डिजिटल मीडिया परिषदेच्या बैठकीत यूट्यूब चैनलच्या संपादक आणि पत्रकारांना परिषदेचे राज्य उपाध्यक्ष शिवराज काटकर यांनी दिलाय.

दरम्यान काही दिवसांपूर्वी यूट्यूब चैनल च्या संपादक आणि पत्रकारांच्या बाबतीत काहिंनी नाहक त्रास देण्याच्या उद्देशाने काही मुद्दे उपस्थित केले होते.याबाबत चर्चा करण्यासाठी सदर बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं.

या सर्व यूट्यूब चैनल्सची तंत्रे सुधारण्यासाठी कंटेंट चांगला होण्यासह त्यांचा अभ्यास वाढवण्याच्या दृष्टीने मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने विविध विषयांवरील वर्ग घेण्यात येणार असून जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार एकत्र येऊन ते ज्ञान आम्ही त्यांना देणार असून ,भविष्यात इथले युट्युब न्यूज चॅनल ,पोर्टल हे सर्वोत्तम कव्हरेज करून,मोठ्या चॅनलच्या तोडीचे काम करतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

यावेळी डिजिटल मीडिया परिषदेचे जिल्हाध्यक्ष तानाजीराजे जाधव,,कार्याध्यक्ष अभिजीत शिंदे, सचिव मोहन राजमाने शहर उपाध्यक्ष ज्योती मोरे .हुपरीकर न्यूज चे विजय हुपरीकर, जी न्यूज चे संपादक शिंदे,अमन एक्सप्रेसच्या संपादक पिंटी कागवाडकर, या सिनेमाच्या एस न्यूज च्या संपादक रेखा दामुगडे मयुरी नाईक, नव प्रसाराच्या संपादक गीता मुधोळकर, सांगली रेसचे संपादक सुहास कदम, एम आर 24 चे संपादक मोहसिन मुजावर,चंद्रकांत गायकवाड आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: