Sunday, December 22, 2024
HomeMobileइन्फिनिक्सने ५० मेगापिक्सल कॅमेरासह 'हॉट १२' लॉन्च...

इन्फिनिक्सने ५० मेगापिक्सल कॅमेरासह ‘हॉट १२’ लॉन्च…

६००० एमएएच बॅटरी, ६.८२ इंचाचा सर्वात मोठा डिस्प्ले

ट्रांसियन ग्रुपचा प्रिमिअम स्‍मार्टफोन ब्रॅण्ड इन्फिनिक्सने नवीन स्मार्टफोन ‘हॉट १२’ लॉन्च केला आहे. ९४९९ रूपये किंमत असलेल्या हॉट १२ मध्ये त्याच्या किंमत विभागातील सर्वात मोठा डिस्प्ले, स्टोरेज क्षमता व बॅटरी आहे.

उच्च-स्तरीय वैशिष्ट्ये, विस्तारित करता येणारी मेमरी आणि सर्वोत्तम कॅमेरा असलेला हा स्मार्टफोन भावी ग्राहकांना सर्वोत्तम व दीर्घकालीन मनोरंजन अनुभव देण्याचे वचन देतो. हा डिवाईस ७-डिग्री पर्पल, टॉरक्वॉइज सियान, एक्सप्लोरेटरी ब्ल्यू आणि पोलार ब्लॅक या चार आकर्षक रंगांच्या व्हेरिएण्ट्समध्ये येतो.  २३ ऑगस्ट रोजी फ्लिपकार्टवर या नवीन स्मार्टफोनच्या विक्रीला सुरूवात होणार आहे.

सर्वात मोठा डिस्प्ले: इन्फिनिक्सच्या रिफ्रेशिंग नवीन हॉट १२ मध्ये ६.८२ इंच ड्रॉप नॉच डिस्प्लेसह एचडी+ रिझॉल्युशन, ९० हर्टझ रिफ्रेश रेट आणि १८० हर्टझ टच सॅम्प्लिंग रेट आहे, ज्यामुळे डिवाईस दीर्घकाळापर्यंत गेमप्लेदरम्यान अत्यंत सुलभपणे कार्यरत राहतो आणि डोळ्यांना थकवा येत नाही. डिवाईसच्या आकर्षक व्युईंग अनुभवाला डीटीएस सराऊंड साऊंड स्पीकरच्या शक्तिशाली ऑडिओ अनुभवाचे पाठबळ आहे, ज्यामधून प्रिमिअम मनोरंजन अनुभवासाठी अधिकतम ऑडिओ आऊटपुट मिळते.

सुधारित सुरक्षितता: हॉट १२ समजण्यास व वापरण्यास सुलभ अशा वैशिष्ट्यांच्या माध्यमातून अतिरिक्त गोपनीयतेची खात्री देतो. या डिवाईसच्या बॅक पॅनेलवर फिंगरप्रिंट सेन्‍सर असण्यासोबत सुधारित फोन सुरक्षितता आणि डिवाईसमध्ये स्टोअर केलेला डेटा आहे.

शक्तिशाली कार्यक्षमता आणि विस्तारित करता येणारी मेमरी/स्टोरेज: मीडियाटेक हेलिओ जी३७ प्रोसेसरच्या शक्तीसह उच्च कार्यक्षम १२ एनएम प्रॉडक्शन प्रोसेस असलेल्या हॉट १२ मध्ये ६४ जीबी इंटर्नल स्टोरेज आहे, ज्याला जवळपास ७ जीबी रॅमचे (४ जीबी एलपीडीडीआर४एक्स रॅम व अतिरिक्त ३ जीबी व्हर्च्युअल रॅम) पाठबळ आहे. या डिवाईसमध्ये समर्पित मेमरी कार्ड स्लॉट देखील आहे, ज्या माध्यमातून युजर मेमरी क्षमता जवळपास २५६ जीबीपर्यंत वाढवू शकतो.

विशाल बॅटरी: हॉट १२ मध्ये ६००० एमएमएच बॅटरी पॉवरहाऊस आहे, जी ६३ दिवसांचा व्यापक स्टॅण्डबाय टाइम देते. युजर्स पॉवर मॅरेथॉन टेकच्या माध्यमातून अल्ट्रा पॉवर मोड कार्यान्वित करू शकतात आणि डिवाईसवरील जवळपास २५ टक्के बॅटरी लाइफचा आनंद घेऊ शकतात.

सर्वोत्तम कॅमेरा अनुभव: हॉट १२ दर्जात्मक कॅमेरा क्षमता देण्याची इन्फिनिक्सची परंपरा कायम ठेवतो. या डिवाईसमध्ये ५० मेगापिक्सल ट्रिपल रिअर कॅमेरासह समर्पित क्वॉड-एलईडी फ्लॅश, २ मेगापिक्सल डेप्थ कॅमेरा आणि एआय लेन्स आहे. या स्मार्टफोनमध्ये फुली लोडेड व्हिडिओ कॅमेरासह विविध कॅटेगरी-फर्स्ट वैशिष्ट्ये आहेत, जसे टाइम-लॅप्स व्हिडिओ रेकॉर्डिंग मोड, एफएचडी व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि स्लो मोशन मोड, ज्यामुळे युजर्सना सुस्पष्टपणे व्हिडिओज कॅप्चर करता येतात.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: