गौण खनिजाचे उत्खनन केल्याचा आरोप फेटाळला
पातूर – निशांत गवई
पातुर तालुक्यातील खेट्री येथील सरपंचाने ७०० ब्रास गौण खनिजाचे उत्खनन केल्याचे आरोपावरून मंडळ अधिकाऱ्यांनी तहसीलदाराकडे सादर केलेल्या अहवालात ५४० ब्रास गौण खनिजाचे उत्खनन केल्याचे नमूद करण्यात आले आहे.
यावर जबाब नोंदविण्याबाबत तहसीलदारांनी सरपंच जहूर खान यांना नोटीस बजावली होती. सरपंचाने लेखी जबाबात गौण खनिजाचे उत्खनन केल्याचे आरोप फेटाळले आहे. तसेच वार्ड क्रमांक एक मधील लोकवर्गणीतून नदीपात्राच्या काठावरील कच्चा रस्ता तयार करण्यात आल्या बाबतचा जबाब शेकडो ग्रामस्थांनी तहसीलदाराकडे नोंदविला आहे.
वार्ड क्रमांक एक मधील ग्रामस्थांना ये जा करण्यासाठी गेल्या २० ते २५ वर्षापासून रस्ताच नव्हता, त्यामुळे विद्यार्थ्यासह ग्रामस्थांना नदीतून पाणी व चिखलातून ये जा करावी लागत होती. अखेर लोकवर्गणीतून नदीतील रुढीने गेल्या काही महिन्यापूर्वी कच्चा रस्ता तयार केल्याने शेकडो ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.
लोकवर्गणीतून नदीतील रूढीने नदीच्या काठावरील कच्चा रस्ता तयार करण्यात आला असून, ग्रामपंचायत स्तरावर संरक्षण भित बांधण्याची मागणीसाठी मला ग्रामस्थांनी बोलावून फोटो काढले, परंतु मुरूम व रूढी उत्खनन बाबत माझा काही संबंध नाही तक्रारीत काही तथ्य नसून बिनबुडाची आहे. जहूर खान सरपंच खेट्री…
शेकडो विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना दिलासा, सर्वजनिक रस्त्यासाठी नदीतील रुढी उचलून अवघ्या काही फुटा अंतरावर टाकून कच्चा रस्ता लोकवर्गणीतून करण्यात आल्याने विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना २५ वर्षानंतर रस्ता मिळाल्याने दिलासा मिळाला आहे.
वॉर्ड क्रमांक एक मधील ग्रामस्थ व विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी रस्ताच नसल्याने चिखलातून ये जा करावी लागत होती, परंतु ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून नदीतील रुढीने कच्चा रस्ता तयार केल्याने ग्रामस्थसह विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. न्यामत खान ग्रामस्थ खेट्री…