द बॉडी शॉप या ब्रिटनमध्ये स्थापना करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय पर्सनल केअर ब्रॅण्डने त्यांच्या नवीन अॅक्टिव्हिस्ट मेकअप श्रेणीच्या लाँचची घोषणा केली आहे. या श्रेणीमध्ये प्रिमिअम, नैतिकदृष्ट्या स्रोत मिळवलेल्या घटकांचे मुख्य तत्त्व असलेल्या अनेक उत्पादनांचा समावेश आहे. या घटकांपैकी ९५ टक्के घटक मूलत: नैसर्गिक आहेत.
अॅक्टिव्हिस्ट मेकअप श्रेणीमध्ये विविध प्रकारची उत्पादने आहेत. या सर्व उत्पादनांमध्ये मूलत: ९५ टक्के प्रिमिअम नैसर्गिक घटकांचा वापर करण्यात आला आहे आणि पुनर्चक्रणीय पॅकेजिंकसह येतात. नवीन कलेक्शनमध्ये फ्रेश न्यूड फाउंडेशन, व्हिटॅमिन सी कन्सीलर, टी ट्री फेस बेस, हेम्प प्राइमर, फ्रीस्टाइल पीगमेंट्स फ्रेम इट – ब्रो, स्वाइप इट लिप बाम आणि शीअर लिप अॅण्ड चीक स्टेन यांचा समावेश आहे.
फ्रेश न्यूड फाउंडेशन नैसर्गिक, सर्वोत्तम आणि चमकदार फिनिश तयार करण्यास मदत करण्यासाठी डिझाइन केले आहे. हे २० शेड्समध्ये उपलब्ध आहे आणि व्हिटॅमिन ई व कम्युनिटी फेअर ट्रेड अॅलो व्हेरा यांच्या सहाय्याने तयार केले गेले आहे, हे फाउंडेशन आधीच सुंदर असलेल्या चेहऱ्याला अधिक सुंदरता देते.
दुसरीकडे, व्हिटॅमिन सी कन्सीलर हे एक परिपूर्ण पॉवरहाऊस आहे, जे डाग व काळ्या चट्ट्यांना दूर करते. हलक्या वजनाचे उत्पादन व्हेगन सोसायटीने प्रमाणित केले आहे, ते दिवसभर टिकते आणि १०० पुनर्चक्रणीय काचेच्या बाटलीमध्ये लिंबूवर्गीय सुगंधासह येते, जे दिवसभर टिकते.
टी ट्री फेस बेस हे पावडर फाउंडेशन आहे, जे तुम्हाला अधिक भडक लुक न देता निर्मळ मॅट लुक देते. केनियाच्या कम्युनिटी फेअर ट्रेड टी ट्री ऑइलने संपन्न फाउंडेशन पावडर नॉन-कॉमेडोजेनिक, घाम व आर्द्रता-प्रतिरोधक आहे, ही पावडर १२ तासांपर्यंत टिकत असल्यामुळे सतत टच अप करण्याची गरज भासत नाही आणि १५ विविध शेड्समध्ये उपलब्ध आहे.
इतकेच नाही तर, हे द बॉडी शॉपच्या २००हून अधिक स्टोअर्सपैकी कोणत्याही स्टोअरमध्ये रिफिल करता येते. तसेच, हेम्प प्राइमर हेम्प सीड ऑइल आणि प्रसिद्ध एडलवाईस अर्कने संपन्न आहे. हे दोन्ही घटक दिवसभर तुमच्या त्वचेचे पोषण आणि संरक्षण करतात. प्राइमर मेकअप लागू करण्यापूर्वी तुमची त्वचा सज्ज करण्यास मदत करते. तुम्ही मेकअप करत नसले तरी मॉइश्चरायझर लावण्यापूर्वी तुम्ही हेम्प प्राइमरचा सीरम म्हणून वापर करू शकता.
स्वाइप इट लिप बाममध्ये नैसर्गिकरित्या स्रोत मिळवलेले हेवी-ड्युटी मॉइश्चराझिंग घटक आहेत आणि नॉन-स्टिकी फॉर्म्युलासह उत्तम सुगंध आहे. हे स्ट्रॉबेरी, ड्रॅगनफ्रूट, ब्लूबेरी, किवी आणि पॅशनफ्रूटसह ५ फ्रूटी फ्लेवर्समध्ये उपलब्ध आहे.
शीअर लिप अॅण्ड चीक स्टेन तुमचा मेकअप रूटिन लक्षणीयरित्या सुलभ करते, तसेच त्वचेला तेजस्वी लुक देते. यामधील हलके, नॉन-स्टिकी आणि हायड्रेटिंग टेक्स्चर १२ तास मॉइश्चरायझेशन देते, ज्यामुळे हे उपयुक्त दैनंदिन मेकअप उत्पादन आहे. हे मेक्सिकोमधील कम्युनिटी फेअर ट्रेड एलो वेराने संपन्न आहे.