गडचिरोली जिल्हातील आलापल्ली येथील उच्च प्रतीचे सागवान जगप्रसिद्ध आहे. येथील सागवानाला अयोध्या येथे प्रभू श्रीरामाच्या मंदिरात लावण्याचा मान मिळाला आहे या निमित्ताने गडचिरोली जिल्ह्याची सोबतच आल्लापलीची मान देशपातळीवर उंचावली आहे.
अवघ्या देशाचे आराध्य दैवत असलेल्या प्रभू श्रीरामचंद्राच्या भव्यदिव्य मंदिराच्या ठिकाणी लागणारे काष्ठ सागवान लाकुड आज रविवारी आल्लापल्ली करांनी मोठ्या हर्षोल्लाहासात रवाना केले.भाविकांनी मोठ्या प्रमाणात गोळा होत या लाकडाची विधिवत पूजा केली त्यांनतर सजविण्यात आलेल्या वाहनावर डीजे च्या तालात शासकीय सा मिल ते वीर बाबुराव चौक पर्यत मिरवणूक काढण्यात आली.महिला वर्गानी गरबा,फेर,फुगडी खेळून हा उत्सव साजरा केला जणू रामनवमी आधीच रामनवमी साजरी करण्या योग आज आल्लापल्ली करायला मिळाला. सर्वत्र आला आपली प्रभू श्रीरामाच्या जयघोषाने निनादले होते.
गडचिरोली जिल्ह्यातील असलेले सागवान लाकूड विविध वस्तू दरवाजे फर्निचर बनवण्यास जगप्रसिद्ध आहेत त्यासाठी अयोध्या येथील श्रीराम मंदिरासाठी लागणारे दरवाजे खिडक्या नक्षीकाम आणि विविध शोभेची वस्तू बनविण्यास, आल्लापल्ली येथील सागवानाची निवड करण्यात आली. अयोध्येचे राम मंदीर देशात सर्वात जिव्हाळ्याचा मुद्दा आहे.९० च्या दशकात देशभरातुन त्यासाठी विटा पाठविल्या गेल्या होत्या.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राम मंदीर निर्माण कार्य सुरु होताच प्रत्येक रामभक्ताने यथाशक्ती आपला खारीचा वाटा पाठविला आहे. तेथे आता या भागातील जगप्रसिध्द सागवान लाकडाची मंदिरात दरवाजे व खिडकी बनविण्यासाठी निवड झाली आहे. आलापल्ली येथील वनविकास महामंडळाच्या साॅ-मील मध्ये तो सागवान लाकुड गोळा करण्यात आला आहे, लाकूड प्रस्थान होत माहीत असताच आलापल्ली भाविकांनी लाकडाचे पूजन केल यात श्रीराम समिती आल्लापल्ली ,व्यापारी संघटना अल्लापल्ली गावातील प्रतिष्ठित नागरिक, श्रीराम भाविक अनेकांनी या लाकडाची पाहणी करून पूजन केले त्या नंतर भव्य शोभायात्रा काढण्यात आले.
ही शोभायात्रा शिव मंदिर पासून अल्लापल्ली वीर बाबुराव चौका पर्यंत मिरवणूक काढण्यात आली या शोभयात्रेमध्ये अनेक भक्तगण सहभागी झाले यात जय श्रीराम जय श्रीराम या गजरात आल्लापल्ली संपूर्ण दुमदुमले यात उपस्थित ह्यांच्याशी संवाद साधला, आपल्या भागातील साहीत्याची निवड होणे ही अत्यंत अभिमानाची तसेच सौभाग्याची बाब आहे असे म्हणाले…