Monday, December 23, 2024
Homeगुन्हेगारीसांगलीत पोलिस उपनिरीक्षकाला लाच घेताना अटक...

सांगलीत पोलिस उपनिरीक्षकाला लाच घेताना अटक…

सांगली – ज्योती मोरे

सांगलीतील विश्रामबाग पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात अटक न करण्यासाठी तसेच तपासात मदत करण्यासाठी 40 हजार रुपयांची लाच मगितल्याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षकास अटक करण्यात आली. सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी दुपारी ही कारवाई केली. याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अकबर खताळसो हवालदार (वय 53, रा. मिरज) असे अटक करण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दिली होती. तक्रारदाराच्या भावासह अन्य दोघांना दाखल गुन्ह्यात अटक न करता केवळ नोटीस देऊन सोडण्यासाठी तसेच गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी हवालदार याने तक्रारदाराकडे 60 हजारांची लाच मागितली होती. त्यानंतर तक्रारदाराने याबाबत सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दिली होती.

त्या तक्रारीची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दि. 17, 20, 22, 24, 31 जानेवारी तसेच 1 फेब्रुवारी रोजी पडताळणी केली होती. त्यावेळी हवालदार याने सुरुवातीला 60 हजार रुपये नंतर 50 हजार त्यानंतर 40 हजार रुपयांची लाच मागितल्याचे स्पष्ट झाले होते.

त्यानंतर आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज लाच मगितल्याप्रकरणी हवालदार याला अटक केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक संदीप पाटील, निरीक्षक विनायक भिलारे, दत्तात्रय पुजारी, धनंजय खाडे, प्रीतम चौगुले, रवींद्र धुमाळ, अजित पाटील, चंद्रकांत जाधव, रामहरी वाघमारे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: