Saturday, November 9, 2024
HomeMarathi News Todayअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आज अटकेची शक्यता!…प्रकरण काय आहे ते...

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आज अटकेची शक्यता!…प्रकरण काय आहे ते जाणून घ्या…

न्यूज डेस्क : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प Donald Trump यांची आज 21 मार्चला अटक केली जाणार असल्याचे माहितीने खळबळ उडाली असून या पार्श्वभूमीवर न्यूयॉर्क पोलिसांनी सोमवारी सुरक्षा व्यवस्था कडक केली. त्यांना अटक झाल्यास झाल्यास त्यांच्या समर्थक मोठ्या प्रमाणावर आंदोलन करणार आहे. या मुद्द्यावर निषेध करण्यासाठी सोमवारी संध्याकाळी केवळ काही ट्रम्प समर्थक न्यूयॉर्कमध्ये जमले. हे प्रकरण 2016 मध्ये पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियलला केलेल्या पेमेंटशी संबंधित आहे.

जर आरोप दाखल झालेत तर ट्रम्प हे अमेरिकेचे पहिले माजी राष्ट्राध्यक्ष असतील ज्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे पाऊल 2024 च्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी त्यांच्या संधींनाही धक्का देणारे ठरेल. दरम्यान, ट्रम्प यांनी सोशल मीडियावरील त्यांच्या ताज्या पोस्टमध्ये दावा केला आहे की मॅनहॅटनचे वकील ‘हश मनी’ प्रकरणात त्याच्यावर आरोप लावणार असल्याने मंगळवारी त्यांना अटक केली जाईल.

ट्रम्प यांचे हे प्रकरण पॉर्न फिल्म अभिनेत्री स्टॉर्मी डेनियलशी संबंधित आहे. ट्रम्प यांचे स्टॉर्मीसोबत अफेअर होते आणि त्याची माहिती लपवण्यासाठी त्यांनी 2016 मध्ये डॅनियल्सला एक लाख 30 हजार डॉलर्स दिले, असा आरोप आहे. या प्रकरणात ट्रम्प यांच्यावर आरोप लावायचे की नाही याचा विचार सरकारी वकील करत आहेत. मॅनहॅटन डिस्ट्रिक्ट एटर्नीने माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना दोषी ठरवले तर ते गुन्ह्याचा आरोप असलेले पहिले माजी अध्यक्ष बनतील. ट्रम्पच्या वकिलाने शुक्रवारी संध्याकाळी सांगितले की मॅनहॅटन ग्रँड ज्युरीने दोषी ठरवले तर त्याचा क्लायंट फौजदारी आरोपांना सामोरे जाण्यास शरण येईल. विशेष म्हणजे, ट्रम्प डॅनियल्ससोबत संबंध असल्याचा इन्कार करत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: