सांगली – ज्योती मोरे
मेडिकल, दवाखाने तसेच घरफोडया करून चोऱ्या करणाऱ्या रमेश रामलिंग तांबारे. वय वर्षे 46, राहणार दत्तनगर,पलूस.तालुका पलूस ,जिल्हा सांगली. याला सांगलीतील माधवनगर रोड बायपास परिसरात चोरीतील दागिने विक्रीसाठी येणार असल्याची माहिती खास बातमीदारा मार्फत मिळाल्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले.
त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या खिशात सोन्याचे दागिने तर गाडीच्या डिकीत सोन्या चांदीचे दागिने चांदीची भांडी तसेच एक 80 हजार रुपये किमतीचा रिवाल्वर असा मुद्देमाल ताब्यात घेतले आहेत. यामध्ये 16 तोळे सोने, एक किलो 355 ग्रॅम वजनाची चांदीची भांडी असा 10 लाख 37 हजारांचा मुद्देमाल मिळून आला.
सदर दागिन्याबाबत विचारपूस केली असता हे दागिने काही दिवसांपूर्वी वडगाव जिल्हा कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील कर्नाळ, येडे निपाणी, सोनी इथल्या घरपोडीतील तर रिवाल्वर हे तासगाव तालुक्यातील शिरगाव मधून चोरल्याचे त्याने कबूल केले.त्यास न्यायालयात हजर केला असता त्यास वीस मार्चपर्यंत पोलीस कस्टडीचे आदेश देण्यात आलेत,अशी माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
दरम्यान सदर मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेली हत्यारे व त्याच्या शेतातील खोलीत ठेवली होती तर काही दागिने हे ओळखीच्या सराफाकडे गहाण ठेवल्याचे त्यांनी सांगितल्याप्रमाणे सदर ठिकाणी जाऊन कटावणी, कटर, मारतुल, टॉर्च, मास्क, जर्किन, पोर्टेबल वजन काटा 48 तोळे सोन्याचे दागिने, 725 ग्रॅम चांदीचे दागिने, चांदीची भांडी, रोख रक्कम 70 हजार रुपये असा मुद्देमाल शेतातील खोलीतून आणि साक्षीदारा कडून हस्तगत करण्यात आला आहे.
एकूण जप्त मुद्देमालात 64 तोळे सोन्याचे दागिने, दोन किलो चांदीची भांडी आणि दागिने ८० हजाराचे रिवाल्वर, टीव्हीएस कंपनीची मोपेड ,रोख रक्कम 73,500 असा एकूण 36 लाख 31 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल,स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे,सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे, संदीप गुरव, बिरोबा नरळे,सागर लवटे, अनिल कोळेकर, सागर टिंगरे ,विक्रम खोत,संतोष गळवे ,अमोल ऐदाळे,संदीप पाटील,कॅप्टन गुंडवाडे,प्रकाश पाटील आदींनी केली.