माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव गांधी यांची आज ७८वी जयंती आहे. यावेळी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी वीर भूमी या त्यांच्या स्मृतीस्थळावर त्यांना आदरांजली वाहिली. यावेळी रॉबर्ट वड्रा यांच्याशिवाय काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल, मल्लिकार्जुन खरगे आणि इतर नेतेही उपस्थित होते.
राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त राहुल गांधींनी त्यांच्या वडिलांची खास आठवण केली. त्यांनी ट्विटरवर एक भावनिक व्हिडीओ शेअर करत लिहिले की, “बाबा, तुम्ही प्रत्येक क्षणी माझ्यासोबत आहात, माझ्या हृदयात. तुम्ही देशासाठी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्याचा मी नेहमीच प्रयत्न करेन.”
पीएम मोदींनीही श्रद्धांजली वाहिली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या ट्विटर हँडलवर लिहिले की, मी देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहतो.
याशिवाय काँग्रेसने आपल्या ट्विटर हँडलवर लिहिले की, ‘आम्ही भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करतो. 21व्या शतकातील भारताचे शिल्पकार या नात्याने भारतातील IT आणि दूरसंचार क्रांतीची सुरुवात झाली.