सांगली – ज्योती मोरे.
भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते श्री केशव उपाध्ये यांची महाराष्ट्राचा 2023 चा अर्थसंकल्प या विषयावर पत्रकार परिषद पार पडली. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पावर बोलताना केशवजी उपाध्ये यांनी हा अर्थसंकल्प म्हणजे महाराष्ट्राच्या दूरगामी प्रगतीचा व विकासाचा अर्थसंकल्प असल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
महाराष्ट्रातील सर्वच समाज घटकातील लोकांना समोर ठेवून त्यांची सामाजिक व आर्थिक उन्नती होण्याच्या दृष्टीने देवेंद्रजी फडणवीस यांनी हा अर्थसंकल्प मांडला आहे. महिला, युवक, अल्पसंख्यांक, शेतकरी कामगार, मध्यमवर्गीय नागरिक, व्यापारी, उद्योजक या सगळ्यांच्या दृष्टीने फायदेशीर व व्यापक असा अर्थसंकल्प असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले. यावेळी माजी आमदार नितीन राजे शिंदे,सरचिटणीस केदार खाडीलकर, सरचिटणीस मोहन वाटवे, कोषाध्यक्ष डॉक्टर भालचंद्र साठे, सतीश खंडागळे ,शुभम कुलकर्णी, अश्रफ वानकर उपस्थित होते.
यावेळी पी.एन.जी. संचालक सिद्धार्थ गाडगीळ यांनी त्यांचे स्वागत केले.