Saturday, November 23, 2024
Homeराज्यजुन्या पेन्शन च्या मागणी साठी गोंडवाना विद्यापीठातील कर्मचारी राज्यव्यापी बेमुदत संपात घेणार...

जुन्या पेन्शन च्या मागणी साठी गोंडवाना विद्यापीठातील कर्मचारी राज्यव्यापी बेमुदत संपात घेणार सक्रीय सहभाग…

सलग दोन महिन्यात विविध मागण्यांसाठी गोंडवाना विद्यापीठातील कर्मचारी संपावर…

गडचिरोली – मिलिंद खोंड

राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र व्दारा संलग्न सरकारी निमसरकारी शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचा-यांच्या प्रलंबित मागण्याच्या पुर्ततेकरीता १४ मार्च २०२३ ला राज्यव्यापी बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. या संपात गडचिरोली येथीलगोंडवाना विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी सहभागी होत आहे. अशी माहिती गोंडवाना विद्यापीठ कर्मचारी संघटनेचे सचिव सतीश पडोळे यांनी दिली आहे.संपात सहभागी होण्याबाबत कुलगुरू व कुलसचिव यांना शिष्टमंडळच्या वतीने निवेदन देण्यात आले.

अंशदायी पेन्शन योजना रद्द करून सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, ही राज्यातील तमाम कर्मचारी वर्गाची मागणी आहे. त्याच बरोबर शिक्षक आणि शिक्षण विषयक अनेक मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहेत. जुनी पेंशन योजनाबाबत राज्यकर्ते वेळोवेळी वेगवेगळी विधाने करून कर्मचाऱ्यांत संभ्रम निर्माण करीत आहे. त्यामुळे समन्वय समितीने पुकारलेल्या संपात सक्रिय सहभागी होण्याचा निर्णय गोंडवाना विद्यापीठ कर्मचारी संघटनेने घेतला आहे.

या संपात गोंडवाना विद्यापीठातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभागी होऊन संप यशस्वी करावा, असे आवाहन गोंडवाना विद्यापीठ कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मनोज जाधव, सचिव सतीश पडोळे यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: