Friday, September 20, 2024
Homeराज्यशासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांचा जुन्या पेन्शनसाठी सांगलीत विराट मोर्चा...

शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांचा जुन्या पेन्शनसाठी सांगलीत विराट मोर्चा…

सांगली – ज्योती मोरे

राज्यातील शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्यात यावी या मागणीसाठी आज सांगलीत हजारो शासकीय निम शासकीय कर्मचाऱ्यांनी विराट मोर्चा काढून आपल्या भावना व्यक्त केल्या.सदर मोर्चाची सुरुवात पुष्पराज चौकातून होऊन जिल्हा परिषद राम मंदिर काँग्रेस भवन स्टेशन चौक राजवाडा चौक मार्गे पुन्हा स्टेशन चौकामध्ये सभेने या मोर्चाची सांगता करण्यात आली.

यामध्ये मोर्चाचे निमंत्रक पृथ्वीराज पाटील आमदार अरुण लाड आमदार विक्रम सिंह सावंत युवा नेते रोहित आर आर पाटील अरुण खरमाटे महापौर दिग्विजय सूर्यवंशी माजी महापौर सुरेश पाटील आदींसह शासकीय निमशासकीय कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी जुनी पेन्शन हक्क संघटनांसह इतर सर्व कर्मचारी संघटना सहभागी झाल्या होत्या.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: