Sunday, December 22, 2024
Homeराज्यजिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर्स आवार येथे ब्रेन डेव्हलपमेंट व हस्ताक्षर कार्यशाळा उत्साहात...

जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर्स आवार येथे ब्रेन डेव्हलपमेंट व हस्ताक्षर कार्यशाळा उत्साहात…

खामगाव – हेमंत जाधव

आज दिनांक ११ मार्च रोजी जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर्स आवार येथे विद्यार्थ्यां करिता हस्तलेखन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.यावेळी कार्यशाळा कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामकृष्ण गुंजकर हे होते प्रमुख उपस्थिती प्रा. सौ सुरेखताई गुंजकर व शाळेचे मुख्याध्यापक श्री संतोष अल्ल्हाट होते.

यावेळी कार्यशाळा मार्गदर्शक प्रमोदकुमार नागरे यांनी विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांची दिनचर्या कशी असावी त्या बद्दल ब्रेन विकास तंत्रज्ञान प्रात्यक्षिक द्वारे विद्यार्थ्यांना विद्यार्थी दशेत असताना लक्ष देण्याची क्षमता वाढविने मेंदूला चालना देणे तसेच विद्यार्थ्यांचा बौद्धिक व शारिरीक विकास करणे आदी गोष्टी हे तंत्रज्ञान वापरून केले जाते.

तसेच वाचन लेखन व निरीक्षण कौशल्याचा वापर करून हस्ताक्षर कसे सुधारावे याबद्दल देखील नगरे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.ही कार्यशाळा दोन सत्रात घेण्यात आली. या वेळी सर्व विद्यार्थी समवेत शिक्षक उपस्थित होते. हस्ताक्षर बरोबर विविध कौशल्याचा वापर करून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे या कार्यशाळेचा उद्देश होता.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: