महेंद्र गायकवाड
नांदेड
लोहा तालुक्यातील मौजे मारतळा येथील मारोती मंदिरासाठी भक्तांनी सोडलेल्या अकरा गाई अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या असून अन्य एका घटनेत कंधार तालुक्यातील हळदा ग्राम पंचायत बांधकामावरील सिमेंट व गजाळी चोरट्यांनी चोरले या दोन्ही प्रकरणी उस्मानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनांक 7 ऑगस्ट ते 8 ऑगस्ट चे दरम्यान, मौ. मारतळा येथील बसस्थानका समोर मारूती मंदीराजवळ मोकळया जागेत कोणीतरी अज्ञात चोरटयांनी मारतळा गावातील मारूती मंदीरास हद्दीतील गावातील भक्तांनी सोडलेल्या अकरा गाई किंमती 3 लाख 90 हजार रूपये मारोती मंदीरा समोरून व बसस्थानक रोडवरून चोरून नेल्या आहेत.
ग्राम पंचायत सदस्य ज्ञानेश्वर शिवाजीराव उबाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन उस्माननगर पोलीस ठाण्या गुरन 145/2022 कलम 379, भादवी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ कानगुले, हे करीत आहेत. उस्मानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दुसऱ्या एका घटनेत कंधार तालुक्यातील हळदा ग्रामपंचायत बांधकामवरून आरोपीने 17 ऑगस्ट रोजी हळदा गावातुन ग्रामपंचायत बांधकामावरून पाच पोते बिर्ला ए-वन कंपणीचे सिमेंट व एक क्विटल गजाळी किंमती 10,000/- रूपयाचा मुद्देमाल चोरून नेले. हनमंतराव शेट्टीबा हळदेकर, व्यवसाय शेती रा. हळदा ता. कंधार जि. नांदेड यांनी दिलेल्या फिर्यादवरुन पोस्टे उस्माननगर गुरन 146 / 2022 कलम 379, भादवी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून असुन तपास पोहेकॉ पवार, हे करीत आहेत.