Monday, December 23, 2024
HomeMarathi News Todayपाकिस्तानात आणखी एक आत्मघाती हल्ला! स्फोटात नऊ पोलिस ठार...

पाकिस्तानात आणखी एक आत्मघाती हल्ला! स्फोटात नऊ पोलिस ठार…

न्युज डेस्क – पाकिस्तानमध्ये आणखी एका दहशतवादी हल्ल्याची बातमी समोर आली आहे. पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात झालेल्या स्फोटात नऊ पोलिसांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. बलुचिस्तानच्या बोलान भागात सोमवारी हा हल्ला झाला. पाकिस्तानी मीडियानुसार हा भाग सिबी आणि कच्छ सीमेवर आहे. प्राथमिक तपासात हा आत्मघाती हल्ला असल्याचे निष्पन्न झाले असले तरी तपासानंतरच याची पुष्टी होईल.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, बलुचिस्तानचे पोलिस कर्मचारी ड्युटीवरून परतत होते. त्याचवेळी हा स्फोट झाला. स्फोट एवढा जोरदार होता की, त्याच्या प्रभावामुळे पोलीस कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारे वाहन उलटले. या स्फोटात 15 पोलीस जखमी झाले आहेत.

पाकिस्तानात अलीकडच्या काळात अनेक दहशतवादी हल्ले झाले आहेत. गेल्या जानेवारीतच पाकिस्तानातील पेशावरमध्ये झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात १०० हून अधिक पोलिस ठार झाले होते. पोलीस मशिदीत नमाज अदा करण्यासाठी जमले असताना हा हल्ला झाला. त्याचवेळी पोलिसांच्या वेशात आलेल्या एका दहशतवाद्याने बॉम्बस्फोटाने स्वत:ला उडवले होते.

हा स्फोट इतका जोरदार होता की मशिदीचे छतही कोसळले, त्यामुळे मृतांची संख्या खूप जास्त आहे. खरे तर तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान आणि पाकिस्तानी लष्कर यांच्यातील युद्धविराम तोडला गेला आणि तेव्हापासून पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ल्यांची लाट आली. विशेष म्हणजे बहुतांश दहशतवादी हल्ल्यांमध्ये पाकिस्तान पोलिसांच्या जवानांना लक्ष्य करण्यात आले आहे.

यापूर्वी फेब्रुवारीमध्येच कराची पोलिस मुख्यालयावर दहशतवादी हल्ला झाला होता. टीटीपीनेच हा हल्ला केला होता. या हल्ल्यात सशस्त्र दहशतवाद्यांनी पोलीस मुख्यालयात घुसून तीन जण ठार तर 10 जण जखमी झाले. मात्र, सुरक्षा दलाच्या कारवाईत पाच दहशतवादी मारले गेले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: