Wednesday, November 27, 2024
Homeराज्यभिगवण मदनवाडीकरांना विकतचे मरण, कोट्यावधी खर्चुन मिळणार विषारी पाणि...

भिगवण मदनवाडीकरांना विकतचे मरण, कोट्यावधी खर्चुन मिळणार विषारी पाणि…

भिगवण – दि. ३ भिगवण आणि मदनवाडी गावाला पिण्याच्या पाण्यासाठी जलजिवन मिशन योजना मंजुर झाली असुन कोट्यावधी रुपयांच्या या योजनेचा उद्भव जलस्त्रोत उजनी बॅक वॉटर असल्याने भिगवण गावाला पुर्वी देखील उजनीचेच पाणि असल्याने ते पिण्यासाठी कोणीच वापरत नाही उजनीचे पाणि दुषीत असल्याने पिण्यासाठी पाणि विकत घ्यावे लागते यामुळे जलजिवण योजना होऊनही येरे माझ्या मागल्या अशीच अवस्था होणार आहे.

मदनवाडी गावातील योजनेला उजनीचा उद्भव जलस्त्रोत दाखवला असुन त्यात बदल सुचविण्यासाठी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे. खडकवासला कॅनॉल वरुन उचल पाणि योजनेच्या माध्यमातुन मदनवाडी तलावाखालील टॅंक मध्ये पाणि सोडुन ते गावाला देण्यात यावे असा मत प्रवाह असल्याने मदनवाडीकरांनी ग्रामसभेचे आयोजन केले आहे मात्र भिगवणची पंच कमीटी उजनीच्या पाण्यावर ठाम असल्याने भिगवणकरांना उजनीचे विषारी पाणिच प्यावे लागणार यात शंका नाही.

कारण गावातील विरोधकही फक्त निवडणुकीपुरते जागे होतात मात्र जनतेच्या प्रश्नावर हताची घडी तोंडावर बोट असे चित्र दिसते. उजनीच्या पाण्याला अतिशय घाण वास असल्याने ते वापराच्या योग्य देखील नाही जलजिवण मिशन योजनेत सॅंड फिल्टर असल्याने पाण्यातील क्षारांचे प्रमाण कमी होते मात्र उग्र वास तसाच राहत असल्याने पिण्यास उपयोगी होत नाही यामुळे भिगवणकरांना पिण्याच्या पाण्यासाठी लाखो रुपये खर्च करावे लागतात भिगवण हा निमशहरी भाग असल्याने शेकडो हॉटेल व्यावसायिक आहेत २० रुपयांना फिल्टर पाण्याचा १ जार विकत घ्यावा लागतो असे दिवसाला ५० जारचे एक हजार रुपये महिन्याला ३० हजार आणि वर्षाला ३ लाख ६० हजार मोजावे लागतात. भिगवणची लोकसंख्या १५ हजारांच्या आसपास असल्याने प्रत्येक कुटुंब पिण्यासाठी विकतचे पाणि घेत आहे यामुळे कोट्यावधी रुपयांचा अपव्यय होत आहे.

मदनवाडीसाठी १४ कोटी रुपयांच्या जवळपास योजनेवर खर्च होणार आहे मात्र उजनीवरुन पाणि आणल्यास सर्व खर्च पाण्यात जाणार आहे यासाठी खडकवासला धरणाच्या शेटफळ कॅनॉल वरुन पाणि आणण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत.

उजनीच्या पाण्यात पुणे शहराचे सांडपाणी आणि अनेक कंपन्या केमीकल सोडत असल्याने पाण्याला दुर्गंधी येते त्वचा रोग, किडणीचे आजार, महिलांना गर्भाशयाचे आजार, आतड्यांचे आजार होत असल्याने पाणि पिण्यास अयोग्य आहे यामुळे विकतचे पाणि प्यावे लागते शासन कोट्यावधी रुपये खर्चुन नविन योजना करत असताना पुन्हा येरे माझ्या मागल्या अशी वेळ का आणावी असा प्रश्न पडतो.

यापुर्वीच्या योजना देखील उजनी वरुनच असताना आत्ताच्या योजना देखील उजनीवरुनच करण्याचा अट्टाहास का ? जनता यावर आवाज उठवणार आहे की आपले मरण हताने जवळ आणणार आहे हे काळच ठरवेल. उजनीवर बारमाही पाणि असल्याने उजनी बॅकवॉटर उद्भव स्त्रोत पकडला आहे मात्र त्यात काही बदल करायचा वाटल्यास संबंधित अधिकारी आणि सहकारी यांच्याशी चर्चा करु असे भिगवणचे सरपंच सौ. दिपिका क्षिरसागर यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: