Friday, September 20, 2024
Homeगुन्हेगारीवरिष्ठांना वाचवण्यासाठी वन विभागाचे शर्यतीचे प्रयत्न, मोठ्या अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी छोट्यांचा बळी घेण्याचा...

वरिष्ठांना वाचवण्यासाठी वन विभागाचे शर्यतीचे प्रयत्न, मोठ्या अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी छोट्यांचा बळी घेण्याचा प्रयत्न…

झाडांची कत्तल व परवानगी पेक्षा जास्त रस्त्याचे खोदकाम झाल्याचे उघड.

पातूर – निशांत गवई

आलेगाव वनपरिक्षेत्र अंतर्गत वन विभागाच्या हद्दीतील सोनुना पांढूर्णा रस्त्याच्या खोतकामात सागवान झाडांची कत्तल व परवानगी पेक्षा जास्त रस्त्याचे खोदकाम झाल्याचे चौकशीत उघड झाल्याने वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यासह अनेक जणावर कारवाईची टांगती तलवार असल्याची दाट शक्यता आहे.

संबंधित अधिकारी व कंत्राटदार यांच्या मिली भागतमुळे परवानगी पेक्षा जास्त खोदकाम करून शेकडो झाडांची कत्तल करण्याचा प्रकार सुरू होता. याबाबत एका व्यक्तीने वन विभागाकडे माहिती अधिकार टाकताच वन विभाग खडबडून जागा झाला, आणि ३ डिसेंबर २०२२ अन्वये वन गुन्ह्याची नोंद केली, दोन महिने उलटूनही कारवाई होत नसल्याने वन प्रेमी रमेश कदम,निलेश सोनोने,

मंगेश इंगळे, पंजाबराव देवकते, यांनी संबंधित वन विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही चौकशी होत नसल्याने वन प्रेमीने थेट अमरावतीच्या मुख्य वन संरक्षक प्रादेशिक यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात करताच मुख्य वन संरक्षक प्रादेशिक अधिकाऱ्यांनी पथक पाठवून चौकशीचे आदेश दिले,

पथकाने २५,२६ फेब्रुवारी या दोन दिवसात केलेल्या चौकशीत परवानगी पेक्षा जास्त रस्त्याचे खोदकाम करून झाडांची कत्तल झाल्याचे उघड झाले, त्यामुळे अहवाल सादर झाल्यावर वन विभागाचे अधिकारी व अनेक जणावर कारवाईची टांगती तलवार असल्याची दाट शक्यता आहे.

वनविभागाच्या हद्दीतील सोनोना पांढूर्णा रस्त्याचे खोतकांमा बाबत चौकशी अंतिम टप्प्यात आहे. अहवाल प्राप्त झाल्यावर लवकरच कारवाई करण्यात येईल मुख्य वन संरक्षक प्रादेशिक अमरावती

माहिती अधिकार टाकताच अधिकाऱ्यांना जाग
परवानगी पेक्षा जास्त रस्त्याचे खोदकाम करून झाडांची कत्तल करण्याचा प्रकार दीड महिन्यापासून सुरू होता. परंतु एका व्यक्तीने माहिती अधिकार टाकताच वन विभाग खडबडून जागा झाला आणि वन गुन्ह्याची नोंद तर केली, मात्र आरोपी दोन महिन्यापासून मोकाटच आहे.

प्रकरण दडपण्याचा प्रयत्न फसला
वन विभागाच्या वरिष्ठ स्तरावरील एका मोठ्या अधिकाऱ्याने रस्त्याचे अंदाजपत्रका नुसार टक्केवारीप्रमाणे आर्थिक व्यवहार करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला होता. परंतु वनप्रेमी उपोषणाला बसल्याने सदर प्रयत्न फसल्याचे बोलले जात आहे.

मोठ्यांना वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न
परवानगी पेक्षा जास्त रस्त्याचे खोदकाम करून झाडांची कत्तल झाल्याचे चौकशीत उघड झाले,सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मोठ्या अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी छोट्यांचा बळी घेण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा आहे.

सदर प्रकरणामध्ये पाहिले अंतरिम अहवाल सदर केला होता. आता पूर्ण चौकशी करून अंतीम अहवाल सादर करण्यात येत आहे .

के सर अर्जुना

सदर वाहनाचा परिसरातील ट्रॅक्टर व इतर वाहनाचा वावर आहे. वन विभागाला सुधा याची कल्पना आहे. वन विभाला हवण पूजा करुण मुहूर्त काढायचा की काय याची परिसरातील चर्चा रंगू लागल्या आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: