Sunday, September 22, 2024
HomeMarathi News Todayहत्ती कॅम्पमधील नवजात पिल्लाच्या मृत्यूचा शवविच्छेदन अहवाल मिळाल्यानंतर कारण स्पष्ठ होईल...उपवनसरंक्षक सिरोंचा

हत्ती कॅम्पमधील नवजात पिल्लाच्या मृत्यूचा शवविच्छेदन अहवाल मिळाल्यानंतर कारण स्पष्ठ होईल…उपवनसरंक्षक सिरोंचा

अहेरी दि.28: सिरोंचा वनविभाग अंतर्गत कमलापुर वनपरिक्षेत्रातील शासकीय हत्ती कॅम्प येथे 8 हत्ती यात 2 नर व 6 मादांचा समावेश आहे. त्यामध्ये मंगला नामक 32 वर्षीय हत्तीण हिची गर्भधारणा झाली होती. जानेवारी 2023 ते फेब्रुवारी 2023 दरम्यान प्रसुती होईल असा अंदाज होता. त्याप्रमाणे दिनांक 27 फेब्रुवारी 2023 रोजी जंगलात प्रसुती झाली, परंतु नवजात पिल्लु मृतावस्थेत आढळले.

त्याची दखल घेऊन मृत पिल्लाच्या शवाचे शवविच्छेदन करण्यात आले व प्रयोगशाळेत चाचणी करीता पाठविण्यासाठी नमूने गोळा करण्यात आले आहेत. प्रयोगशाळेतील अहवालानंतर नवजात पिल्लाचे मृत्यु कशामुळे झाले याची माहिती मिळू शकेल. प्रसुती नंतर मंगला नामक हत्तीणचे प्रकृती चांगली आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूरचे पशुवैद्यकीय अधिकारी व मुलचेराचे पशुधन विकास अधिकारी यांनी शवविच्छेदन केले आहे असे उपवनसरंक्षक सिरोंचा वनविभाग, सिरोंचा पूनम पाटे यांनी कळविले आहे.

हत्तींच्या मृत्यू बाबत न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार
सीरोंच्या वनविभागातील राज्यातील एकमेव हत्ती कॅम्प असलेल्या कमलापूर हत्ती कॅम्प मधील गेल्या दोन वर्षात हत्तींच्या झालेल्या मृत्यु बद्दल न्यायालयात याचिका दाखल करून न्यायालयीन चौकशी करण्यासाठी मागणी करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटी कोंडावार यांनी म्हटले आहे.वनविभागाने या ठिकाणी हत्तीच्या देखरेखीसाठी आवश्यक सोई सुविधा पुरवुन येथील सोंदर्य जपावे असे ते म्हणाले

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: