Friday, September 20, 2024
Homeराजकीयकेंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री जोतीरादित्य सिंधिया यांनी कवलापूर विमानतळ आणि विमानतळाशी...

केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री जोतीरादित्य सिंधिया यांनी कवलापूर विमानतळ आणि विमानतळाशी संबंधित उद्योग उभारण्यासाठी सकारात्मक निर्णय घेऊ :- मकरंद देशपांडे…

सांगली – ज्योती मोरे.

सांगलीच्या विकासासाठी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री जोतीरादित्य सिंधिया यांच्याशी कोल्हापूर येथे आमदार सुधीरदादा गाडगीळ व पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत राज्यसभा खासदार धनंजय महाडिक, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य शेखर इनामदार, जनस्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी मागणी करून निवेदन दिले.

सांगलीपासून जवळच असलेल्या कवलापूर येथे विमानतळासाठी 60 वर्षापूर्वी 160 एकर जागा आरक्षित करण्यात आली होती. तसेच या जागेवर या ठिकाणी धावपट्टीसाठीही जागा आरक्षित होती. व तेथे धावपट्टी करण्यात आली होती.

अनेक वर्षांपासून ही जागा विमानतळासाठी आरक्षित ठेवली आहे. मात्र अद्याप त्या ठिकाणी विमानतळ झालेले नाही. सध्या ही जागा औद्योगिक विकास महामंडळाच्या ताब्यात आहे. ही जागा काही कारणासाठी एका खाजगी कंपनीस विकण्याचा तथा विकसित करण्याचा प्रस्ताव झाला होता.त्यावेळेस सांगलीकर जनतेकडून त्या प्रस्तावास विरोध झाला होता. तरी सदर जागा विकण्याचा तथा विकसित करण्याचा प्रस्ताव रद्द झाल्याचे समजते. परंतु सदरच्या जागेवर विमानतळच व्हावे अशी जनतेतून मागणी आहे.

भाजप सरकार केंद्रात आणि राज्यात सत्तेवर आल्यापासून सांगलीचा विकास वेगाने होत आहे. सांगलीपासून जवळच चार राष्ट्रीय महामार्ग जात असल्यामुळे या परिसरात शेती व उद्योग धंद्यांना पूरक वातावरण निर्माण होत आहे. मात्र मोठ्या कंपन्या सांगलीत उद्योगासाठी येण्यास विमानतळही महत्त्वाची गरज आहे.

त्यामुळे शेतकरी तसेच औद्योगिक विकासासाठी सदर प्रकल्प मंजूर करावा व सांगली कवलापूर विमानतळाच्या आरक्षित जागेसाठी आणखी काही जमीन अधिग्रहण करून व आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदिजींच्या “उडान” या महत्वपूर्ण प्रकल्पाअंतर्गत सदर जागेवर सांगली जिल्ह्यासाठी विमानतळाचा प्रकल्प पूर्ण करावा हि विनंती.

विमानतळ बांधणे हे मुख्य उद्दिष्ट असले तरी, महत्त्वाचे उद्दिष्ट (विकास), विमाने यांच्या निर्मितीशी संबंधित उद्योग, तसेच अवकाश, क्षेपणास्त्रे आणि विमानतळांशी संबंधित उद्योग विकसित करणे हे आहे. परिणामी उद्योग सांगली जिल्ह्यात रोजगार निर्मिती करणार आहेत.

यामुळे सांगली जिल्ह्याचा आर्थिक विकास व प्रगती वाढेल. अशी चर्चा या बैठकी मध्ये करण्यात आली. यासाठी दिलेल्या निवेदन व मागणी नुसार केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री जोतीरादित्य सिंधिया यांनी कवलापूर येथील जागेची तत्काळ पाहणी करून विमानतळ आणि विमानतळाशी संबंधित उद्योग उभारण्यासाठी योग्य ती सकारात्मक कार्यवाही करू असे आश्वासन दिले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: