Friday, September 20, 2024
Homeराज्यप्रभाग क्रमांक ८ चे नगरसेवक राजेंद्र कुंभार यांच्या वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा...

प्रभाग क्रमांक ८ चे नगरसेवक राजेंद्र कुंभार यांच्या वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा होणार – संयोजक महेश सागरे…

सांगली – ज्योती मोरे.

सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे प्रभाग क्रमांक 8 चे विद्यमान नगरसेवक राजेंद्र कुंभार यांचा वाढदिवस 28 फेब्रुवारी रोजी विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा केला जाणार आहे.

दरम्यान जिजामाता कॉलनी, सत्य साईनगर,विद्यानगर, सुखकर्ता पार्क आदी भागातील रस्त्यांच्या डांबरीकरणाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते केला जाणार आहे. या प्रभागातील दत्त मारुती मंदिर ,लक्ष्मी नगर,कुपवाड येथे दुपारी 1 ते 5 दरम्यान रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, याचे उद्घाटन वास्तुविशारद प्रमोद चौगुले यांच्या हस्ते होणार आहे. सायंकाळी 5.30 वाजता शून्यातून विश्व निर्माण करणारे महान व्यक्ती या विषयांवर प्राध्यापक देवानंद जंबगी यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

सायंकाळी 6.30 ते 7.30 वाजता हास्य सम्राट अजितकुमार कोष्टी यांच्या हास्यविनोदाचा कार्यक्रम होणार आहे. त्यामध्ये विविध क्षेत्रात प्राविण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांसह,नागरिकांचा सत्कारही करण्यात येणार आहे. नगरसेवक राजेंद्र कुंभार यांचा नागरी सत्कार गणपती मंदिर, लक्ष्मी नगर येथे केला जाणार आहे.

यासाठी पालकमंत्री तथा कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे, खासदार संजय पाटील,आमदार सुधीर गाडगीळ आदी मान्यवरांसह भाजपचे अनेक पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती संयोजक महेश सागरे यांनी दिली आहे. सदर कार्यक्रमासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे अवाहन सागरे यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: