नांदेड – महेंद्र गायकवाड
धर्माबाद शहरातील साठेनगर भागात घरातील टीव्हीचा सेटॉप बॉक्स खोलून विद्युत पीन लावत असताना दुर्दैवाने पंधरा वर्षांच्या बालकाचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना १६ ऑगस्ट रोजी घडली. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. धर्माबाद शहरातील साठेनगर येथील रहिवाशी गणेश साहेबराव कोरलेलू (१५) हा नववी वर्गात शिकत होता. त्याच्या घरातील टीव्ही खराब झाली होती. घरात कोणीच नव्हते, आई वडील कामाला गेले असता गणेश हा दुपारी घरी टीव्हीला काय झाले म्हणून पाहत होता.
टीव्हीचा सेटॉप बॉक्स खोलून दुरुस्त करताना विजेचा शॉक लागून सेटॉप बॉक्सवर उबडा पडला. त्याचा जागेवरच मृत्यू झाला. छातीत विजेच्या प्रवाहाने छिद्र पडले होते. त्यांचे वडील बाहेरून घरी येताच मुलाला पाहून आरडाओरडा करून शेजाऱ्यांच्या मदतीने ग्रामीण रुग्णालयात नेले असता, डॉ. शेख इक्बाल यांनी त्यास मृत घोषित केले.
गणेश याच्या मृत्यूने शहरात हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, बहीण आहे. या घटने मुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जातआहे.हल्ली मुलांना टिव्ही पाहणे व मोबाईलवर गेम खेळणे याची सवय लागली यामुळे त्यांचे मोठया प्रमाणात नुकसान होत आहे.
पालकांनी या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे असून शाळेमध्ये देखील विद्यार्थ्यांना विद्युत वस्तू विषयी काळजी घेण्याचे ज्ञान देणे महत्वाचे आहे जेणे करून विद्यार्थ्यांना भीती व विद्युत वस्तू हाताळण्याची समज येऊ शकेल.