Wednesday, October 23, 2024
HomeMarathi News TodaySonu Nigam | सोनू निगम आणि त्याच्या भावावर चेंबूरच्या कार्यक्रमात हल्ला…'या' आमदाराच्या...

Sonu Nigam | सोनू निगम आणि त्याच्या भावावर चेंबूरच्या कार्यक्रमात हल्ला…’या’ आमदाराच्या मुलावर गुन्हा दाखल…

Sonu Nigam : प्रसिद्ध गायक सोनू निगमबाबत एक चिंताजनक बातमी समोर येत आहे. एका संगीत कार्यक्रमादरम्यान गायकावर हल्ला झाला आहे. गायकासोबतच त्याच्या भावावरही हल्ला झाला आहे. सोनू निगम धोक्याबाहेर आहे, पण त्याचा भाऊ गंभीर जखमी आहे. सध्या दोघेही रुग्णालयात दाखल आहेत. या हल्ल्यातून त्याच्या अंगरक्षकाने त्याला सुखरूप वाचवल्याचे सोनू निगमचे म्हणणे आहे.

चेंबूरमध्ये लाइव्ह म्युझिक कार्यक्रमादरम्यान गायकासोबत ही घटना घडली. उद्धव ठाकरे सेनेचे आमदार प्रकाश फाटरपेकर यांचा मुलगा स्वप्नील फाटरपेकर यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. काही लोकांनी सोनू निगमला धक्काबुक्की केली. गायकासोबत असभ्य वर्तनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये काही लोक सोनू निगमवर पायऱ्या उतरत असताना हल्ला करताना दिसत आहेत. गायकाच्या अंगरक्षकाच्या हस्तक्षेपामुळे सोनू निगम सुखरूप आहे, मात्र त्याचा भाऊ या हल्ल्यात गंभीर जखमी झाला आहे. घटनेनंतर दोन्ही भावांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले.

काही वेळापूर्वी सोनू निगमने लाऊडस्पीकरमधून येणाऱ्या अजानच्या आवाजावर टिप्पणी केली होती. सिंगर यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा याच्याशी संबंध जोडला जात आहे. कार्यक्रमादरम्यान काही लोकांनी सोनू निगमसोबत सेल्फी काढण्यास सुरुवात केली आणि त्यादरम्यान त्यांच्यावर हल्ला झाला.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: