Monday, December 23, 2024
Homeराज्यअखिल भारतीय वनक्रिडा स्पर्धेत राज्यातून प्रथम आल्याबद्दल वन कर्मचाऱ्यांचा सामाजिक कार्यकर्ते व...

अखिल भारतीय वनक्रिडा स्पर्धेत राज्यातून प्रथम आल्याबद्दल वन कर्मचाऱ्यांचा सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार संघटनेच्या वतीने सत्कार

गडचिरोली:19फेब्रुवारी
चंद्रपूर येथे झालेल्या26 व्या अखिल भारतीय वनक्रिडा स्पर्धेत भामरागड वनविभागाचे दोन वन कर्मचारी राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी पात्र झाले आहे.त्याबद्दल त्यांच्या या कामगिरी साठी आलापल्ली येथे सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांच्या हस्ते दोन्ही वन कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात आले.

वनरक्षक जी .जे . ओईमबे यांनी 83 वजन गटातून पॉवर लिफ्टिंग या प्रकारात महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक पटकाविला तसेच भामरागड वन विभागात कार्यरत वनरक्षक कुमरे यांनी दहा किलोमीटर चालने खुल्या प्रकारात महाराष्ट्र प्रथम क्रमांक पटकाविला हे दोन्ही खेळाडू हरियाणा येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील वन क्रीडा स्पर्धेसाठी पात्र झालेले आहेत त्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार संघटनेच्या वतीने शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

दुर्गम दुर्गम भागात वनाचे रक्षण करताना दोन्ही खेळाडूंनी वनसेवा करील आपले छंद जोपासून वनविभागाचे नाव राष्ट्रीय स्तरावर नेण्यात मोलाचा वाटा उचललेला आहे त्यांच्या या कामगिरीबद्दल परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे .

यावेळी झालेल्या सत्कार समारंभाला महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष मिलिंद खोंड अहेरी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष ऋषी सुखदेवे व्यावसायिक बंडू भांडेकर ,पत्रकार रामू मादेशी,शिवा पवार सह दोन्ही खेळाडूंच्या परिवाराची उपस्थिती होती.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: