Friday, September 20, 2024
Homeराज्यखामगांव | पत्रकारांवरील लाठीमार विरोधात निवेदन...

खामगांव | पत्रकारांवरील लाठीमार विरोधात निवेदन…

मा.श्री.जिल्हाधिकारी साहेब बुलढाणा जिल्हा बुलढाणा, मा.श्री.उपविभागीय अधिकारी साहेब खामगांव

खामगांव – शेतकरी आंदोलनाची बातमी कव्हर करीत असणाऱ्या पत्रकाराला ज्या पोलिस अधिकाऱ्यांनी लोटपाट करून अर्वेच्य भाषेत बोलचाल करून हिन दर्जाची वागणूक दिली त्या अधिकाऱ्यावर शिस्त भंगाची कार्यवाही करणे बाबत.

मा. महोदय. आम्ही खालील सही करणार खामगांव प्रेस क्लब खामगांवचे सर्व पत्रकार बांधव आपणास हे लेखी निवेदन देत आहोत की आपल्या बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा येथील आमचे पत्रकार विवेक गावंडे हे रविकांत तुपकर यांच्या शेतकरी आंदोलनाची बातमी कव्हर करीत असताना या प्रसंगी हजर असलेले पोलिस अधिकारी यांनी पत्रकार विवेक गावंडे यांना लोटपाट करून आर्वेच भाषेत बोलचाल करून हिन दर्जाची वागणूक दिली आहे. आम्हा पत्रकार बांधवांनचे प्रत्येक घटनेची आंदोलनाची बातमी ही सर्व सामान्य जनते पर्यंत पोहोचविणे हे कर्तव्य व आमचे काम ही आहे.

आणि हे काम आमचे पत्रकार बांधव निर्भिड पणे बजावत असताना पोलीस अधिकारी यांनी आमच्या पत्रकार बंधवाशी गैरवर्तन करून चुकीची वागणूक दिली आहे पोलीस अधिकाऱ्याच्या या चुकीच्या वागणुकी मुळे आम्हा सर्व पत्रकार बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत.

म्हणून आम्ही खामगांव प्रेस क्लब खामगांवच्या वतीने या घटनेचा व पोलिस प्रशासनाचा जाहीर निषेध व्यक्त करीत आहोत व ही चुकीची बाब करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्या वर शिस्त भांगाची कार्यवाही व्हावी या मागणी करिता निवेदन सादर करित आहोत तरी आपण या घटनेची गंभीरतेने दखल घेऊन त्या पोलिस अधिकाऱ्या वर कायदेशीर कारवाई करून हे राज्य कायद्याचे न्यायाचे आहे हे दाखवुन द्यावे व आम्हा पत्रकार बांधवांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी आम्ही खामगांव प्रेस क्लब खामगांव चे सर्व पत्रकार बांधव आपणास या लेखी निवेदना व्दारे करीत आहोत.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: