Friday, September 20, 2024
HomeMarathi News Today'बेशरम रंग' हे गाणे ६० च्या दशकात बनले असते तर कसे गायले...

‘बेशरम रंग’ हे गाणे ६० च्या दशकात बनले असते तर कसे गायले असते…क्रिएटिविटी ला सलाम…पहा Video

न्यूज डेस्क – सोशल मिडीयावर अनेकदा रील्सचा भंडार पाहायला मिळतो मात्र त्यातील काही असे मिम्स असतात जे बघून आपले मनोरंजन करतात, असाच एका गाणाचे रील सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणचा ‘पठाण’ चित्रपटाने अनेक विक्रम रचले. चित्रपटाचे कलेक्शन 1000 कोटींच्या जवळ पोहोचले असून अजूनही या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. बॉयकॉट बॉलीवूडचा ट्रेंड मोडून काढणारा हा चित्रपट सुपर डुपर हिट ठरला आहे.

या चित्रपटातील सुपरहिट गाणे बेशरम रंग प्रदर्शित होण्याआधीच त्याची चर्चा आणि विरोध झाला होता, पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, हे गाणे 60 च्या दशकात आले असते तर ते कसे गायले गेले असते आणि चित्रीकरण केले गेले असते.

60 च्या दशकाला हिंदी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ म्हटले जाते. ‘पठाण’ चित्रपटातील बेशरम रंग हे गाणे त्यावेळी रिलीज झाले असते तर ते कसे गायले असते? रॅपर आणि कंटेंट क्रिएटर यशराज मुखाटे यांनी त्याच्या नवीन इंस्टाग्राम रीलमध्ये याची झलक दिली आहे. तेव्हा हे गाणे केले असते तर कसे वाटले असते. रीलमध्ये, मुखाटे स्पष्ट करतात की तो व्हिडिओ तयार करण्यासाठी कॉमेडियन केतन सिंगकडून प्रेरित झाला होता. या क्लिपमध्ये तुम्हाला ६० च्या दशकातील सुपरहिट स्टार शम्मी कपूर पाहायला मिळणार आहे. व्हिडिओ अशा प्रकारे एडिट करण्यात आला आहे की हे गाणे खरोखरच त्या काळातील आहे आणि ते शम्मी कपूर यांच्यावर चित्रीत करण्यात आले आहे असे वाटते.

या व्हिडिओला 1.2 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज आले आहेत आणि 1.5 लाखांहून अधिक लाईक्स आले आहेत. व्हिडिओवर टिप्पणी करताना, संगीत दिग्दर्शक विशाल-शेखर यांनी याला जबरदस्त आणि आश्चर्यकारक म्हटले आहे. त्याचबरोबर सोशल मीडिया यूजर्स या क्रिएटिव्हिटीचे कौतुक करत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: