तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र लक्षेश्वर संस्था लाखपुरी येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव निमित्त पत्रकार बैठकीचे दिनाक -११ -०२-२०२२ रोजी आयोजन करण्यात आले होते. सदर महाशिवरात्री निमित्त पत्रकार परिषद व स्नेहभोजनाचा कार्यक्रम लक्षेश्वर श्री. लक्षेश्वर वारकरी सांप्रदायीक मंडळ, लक्षेश्वर प्रार्थना मंडळ, श्री. लक्षेश्वर आरती मंडळ, श्री. लक्षेश्वर ढोलाचे भजन मंडळ, श्री. लक्षेश्वर गुरुदेव सेवा भजन मंडळ लाखपुरी यांनी आयोजीत केला होता.
या पत्रकार परिषदेमध्ये दर्यापुर तसेच मुर्तिजापुर तालुक्यातील ग्रामिण तसेच शहर विभागतील पत्रकाराची उपस्थीती होती. महाशिवरात्री पर्वावर लाखपुरी येथे १४ फेंबुवारी २०२३ पासुन २० फेंबुवारी २०२३ संगीतमय शिव महापुराण कथा ज्ञानयज्ञ तसेच विविध कार्यक्रम महाशिवरात्री पर्वावर होणार आहे तरी पंचक्रोसातील भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन लक्षेश्वर संस्थांच्या वतीने करण्यात आले होते. आज या पत्रकार परिषदेमध्ये दर्यापुर येथील ज्येष्ठ पत्रकार गजानन देशमुख, विनोदपाटील शिंगणे, अमोल कंटाळे ,विक्की होले, सरजु बहुराशी, संतोष मिसाळ, निलेश पारडे, मुर्तिजापूर येथील ज्येष्ठ पत्रकार, पि.एन बोळे, प्रा अविनाश बेलाडकर, प्रा.दिपक जोशी,जयप्रकाश रावत, अँड .निलेश सुखसोहळे , गजानन गवई, अजय प्रभे, अतुल नवघरे, मिलींद जामनिक, मच्छिद्र भटकर, प्रतिक कु-हेकर, नरेन्द्र खवले,अर्जुन बलखंडे,श्रीकृष्ण भट्टड , एडवोकेट चंद्रजीत देशमुख , मलकापूर येथील जीवन गवळी , मुकुंदराव देशमुख तसेच मुर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
लक्षेश्वर संस्थांचे पदाधिकारि व सेवाधारी व भक्तगण , श्री. लक्षेश्वर वारकरी सांप्रदायीक मंडळ , लक्षेश्वर प्रार्थना मंडळ , श्री. लक्षेश्वर आरती मंडळ , श्री. लक्षेश्वर ढोलाचे भजन मंडळ ,श्री. लक्षेश्वर गुरुदेव सेवा भजन मंडळ लाखपुरी इ . उपस्थित होते . या पत्रकार परिषदेमध्ये प्रा. दीपक जोशी , प्रा.अविनाश बेलाडकर , पी एन बोळे , गजानन देशमुख , यांनी लक्षेश्वर संस्थांच्या ऐतिहासिक विस्तृत माहिती व व लक्षेश्वर संस्थांच्या एकूण एक मूर्तीबद्दल विस्तुत माहिती व संस्थांच्या कार्याबद्दल विविध विषयाची माहिती यावेळी दिली. सदर पत्रकार बैठकीचे संचालन व आभार संस्थांचे अध्यक्ष राजू दहापुते यांनी मानले.