मुंबई: सुमारे दोन दशकांपूर्वी राजस्थानमधील एका छोट्याशा गावात राहणाऱ्या सुनीता शर्मा या आपल्या कुटुंबाच्या चांगल्या आयुष्यासाठी आणि रोजगारासाठी आपल्या पती व कुटुंबासह गुजरातच्या सुरत शहरात आल्या. सुनीता या गृहिणी असून पाच मुलांच्या आई आहेत. सुनीता यांचा बहुतांश वेळ हा आपल्या पतीच्या छोट्या व्यवसायात मदत करण्यात आणि मुलांचे संगोपन करण्यात जातो. साल २०२० मध्ये सुनीताला त्यांच्या पतीने रम्मी या खेळाची ओळख करून दिली. सुनीताने पहिल्यांदा जंगली रम्मीवर मोफत गेम खेळायला सुरुवात केली.
काही काळानंतर सुनीता यांच्यामध्ये जंगली रम्मी खेळण्याचा आत्मविश्वास निर्माण झाला. मग त्यांनी हळूहळू रोख स्पर्धांमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली. सुनीता यांनी त्यांच्या गेमिंग वॉलेटमध्ये फक्त १०० रुपये जमा केले होते आणि आतापर्यंत त्यांनी सुमारे दीड करोड रुपये जिंकले आहेत. तसेच यादरम्यान त्यांनी भारतातील हजारो कुशल रम्मी खेळाडूंना पराभूत करून ग्रँड फिनालेसाठीचा आपला प्रवास सुरू केला आहे.
रम्मी या खेळातील आपल्या कौशल्याचा पुरेपूर उपयोग करून सुनीता दीड करोडची रक्कम जिकूंन त्या आतापर्यंतची सर्वात मोठी रम्मी करोडपती बनल्या आहेत. सुनीता आणि त्यांच्या कुटुंबाला सुरुवातीला सुनीता यांच्या विजयावर विश्वासच बसत नव्हता. पण आता त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही.
यावेळी सुनीता शर्मा म्हणाल्या की, इतकी मोठी रक्कम जिंकणे हा विजय माझ्यासाठी स्वप्नपूर्तीसारखा आहे.दीड करोड जिंकणे ही माझ्यासाठी, माझे पती आणि आमच्या मुलांसाठी खूप मोठी गोष्ट आहे. ही जिंकलेली रक्कम आमची सद्यस्थिती सुधारण्यासाठी खूप उपयुक्त ठरेल तसेच आमच्या मुलांच्या भविष्यकाळासाठी ही रक्कम उपयोगी ठरले. गेल्या काही वर्षांत रम्मी, फँटसी स्पोर्ट्स आणि लुडो अॅप सारख्या ऑनलाइन कौशल्य-गेमिंग प्लॅटफॉर्मच्या वापरकर्त्यांच्या संख्येत खूप मोठी वाढ झाली आहे. वापरकर्त्यांची ही वाढ चित्रपट, ओटीटी आणि पॉडकास्टसारख्या इतर माध्यम श्रेणींपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे.
डिजिटल इंडिया उपक्रम आणि देशातील इंटरनेट पायाभूत सुविधांच्या वृद्धीनंतर भारतातील ऑनलाइन गेमिंग उद्योग हा वेगाने वाढला आहे. यामुळेच आजकाल भारतात लहान शहरे व ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांसाठी शिकण्याच्या आणि विकासाच्या संधी अनेक पटींनी वाढल्या आहेत. भारतातील लाखो लोक दररोज ऑनलाइन गेमिंग प्लॅटफॉर्मवर त्यांची कौशल्ये वापरण्यासाठी व मनोरंजनासाठी नोंदणी करत आहेत.