गोकुळ शिरगाव – राजेद्र ढाले
गोकुळ शिरगाव (एम आय डी सी) येथील महावितरण कार्यालयाच्या वतीने राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा 2023 पार पडल्या यामध्ये कोल्हापूर परिमंडळाच्या अतंर्गत कागल उपविभागीय कार्यालयाच्या अंतर्गत येणारे गोकुळ शिरगाव शाखा कार्यालयातील कर्मचारी प्रमोद ढेरे यांच्या कबड्डी संघांचा व्दितीय क्रमांक आला व भुमिका आहिर यांचा 200, मिटर धांवण्यामध्ये व्दितीय क्रमांक आला याबद्दल शाखा कार्यालयाच्या वतीने सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी प्रमोद ढेरे यांचा सत्कार कागल उपविभागीय उपकार्यकारी अभियंता विनोद घोलप यांच्या हस्ते करण्यात आला तर भुमिका भोयर यांचा सत्कार कसबा सांगाव शाखा कार्यालयाचे सहायक अभियंता तानाजी कोरवी यांच्या हस्ते करण्यात आला कार्येक्रमाच्या अध्यक्ष स्थानी उपकार्यकारी अभियंता विनोद घोलप हे होते.
तर प्रमुख पाहुणे म्हणून गोकुळ शिरगाव ग्रामीण कार्यालयाचे सहायक अभियंता राजेंद्र कांबळे गोकुळ शिरगाव (एम.आय.डी.सी) चे साहाय्यक अभियंता सुहास शिंदे हे लाभले व कर्मचारी दिगंबर सुतार शैलेश कांबळे जमीर देसाई अरूण चौगुले ऑपरेटर सतिश पुजारी शिवाजी पाटील सतिश यादव मेघां मानकर आनंद चोपडे श्रेणिक पाटील सह मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्ञानेश्वर पांचाळ यांनी परिश्रम घेतले.