रामटेक – राजू कापसे
रामटेक येथील अजय दयाराम कांबळे वय ४२ वर्षे रा.मंगळवारी वार्ड ह.मु. शितलवाडी हा ५ फेब्रुवारी पासून बेपत्ता झालेला होता. आज शेवटी ८ फेब्रुवारी ला त्याचा मौजा खात ता.मौदा शिवारातील पेंच कालव्यात मृतदेह च आढळला. घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.
- मिळालेल्या माहितीनुसार हकीकत अशाप्रकारे आहे की मृतक अजय हा नगरधन येथील सूर्यलक्ष्मी कॉटन मिल येथे असिस्टंट पदावर कार्यरत होता. तो ५ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजता दरम्यान कंपनीमध्ये कर्तव्यावर निघाला होता. पण तो दुसऱ्या दिवसी घरी परत आला नाही. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांनी शोधाशोध सुरू केली.
पण शोध लागला नाही. त्यामुळे ६ फेब्रुवारी रोजी रामटेक पोलीसात बेपत्ता असल्याची माहिती दिली होती. त्यामुळे रामटेक पोलीस व कुटुंबातील सदस्यांनी शोध कार्य सुरू ठेवले तेव्हा मृतक अजय कांबळे हा खात शिवारातील पेंच कालव्यात मृत अवस्थेत आढळून आला. मृतकासंबंधी माहिती घेतली असता तो कंपनीमध्ये कामावर जात असताना नगरधन शिवारातील रामटेक ते मौदा रोड लगत आसलेल्या नगरधन जवळील काल्याव्यात गाडी स्लीप झाल्याचा अंदाज नागरिकांच्या चर्चेतून पुढे येत आहे तर काही नागरिक अपघात झाला असल्याचा अंदाज दर्शवित आहेत.
ही घटना अरोली पोलीस स्टेशन हद्दीतील असल्याने आरोली पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. मृतकाची उत्तरीय तपासणी उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथे केली. पुढील तपास पोलीस करीत आहे. त्यांच्या मृत्युपच्यात पत्नी एक मुलगा व मुलगीआहे. त्यांच्या मृत्यूमुळे परिवारात शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे.