Sunday, September 22, 2024
Homeराजकीयआम आदमी पार्टीचा नागरी सुविधांसाठी महानगरपालिकेवर मोर्चा...

आम आदमी पार्टीचा नागरी सुविधांसाठी महानगरपालिकेवर मोर्चा…

सांगली – ज्योती मोरे

सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील वार्ड क्रमांक एक अस्वले मळा या भागात सध्या नागरी सुविधांची वानवा इथल्या स्थानिक नागरिकांना भासत आहे. महानगरपालिकेच्या वतीने पुरविण्यात येणाऱ्या गटार,स्ट्रीट लाईट, घंटागाडी, औषध फवारणी यासारख्या नागरी सुविधांसाठी नागरिकांना आ वासून बसावे लागत आहे.

शिवाय या भागात असणाऱ्या महापालिकेच्या 40 फुटी रस्त्यावर कुंपण टाकून इथल्या एका नागरिकाने प्लॉटिंग स्कीम सुरू केली असून, याबाबतीत इथल्या स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा महानगरपालिकेला निवेदने देऊन मागणी केली असतानाही महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने, आज आम आदमी पार्टीच्या वतीने मधील जनसंपर्क अभियानांतर्गत इथल्या नागरिकांना सोबत घेऊन महानगरपालिकेवर आज मोर्चा काढून महापालिकेच्या आवारात ठिय्या आंदोलन केले.

शिवाय इथल्या नागरिकांच्या मागण्यांचे निवेदन उपायुक्त स्मृती पाटील यांना देण्यात आले.पश्चिम महाराष्ट्र सचिव वसीम मुल्ला जिल्हा शहराध्यक्ष कृष्णा आलदर जिल्हा शहर उपाध्यक्ष आरिफ मुल्ला सचिव युवराज मगदूम संघटक फैया सय्यद खजिनदार जोहेब मुल्ला, संतोष मगदूम, रिक्षा संघटनेचे सांगली जिल्हा अध्यक्ष संभाजी मोरे ,सचिव इमरान पठाण, संघटक सतीश सौंदडे, मिरज शहराचे अध्यक्ष शिवाजी गायकवाड, उपाध्यक्ष रवी बनसोडे,

संघटक श्रीकांत चंदनवाले, निवृत्ती जाधव, अजहर मुतवली, जहांगीर आगा, संदीप कांबळे, कुपवाड शहराचे राम कोकरे, युवा आघाडी अध्यक्ष सागर भोसले, उपाध्यक्ष तौफिक हवालदार, सचिव निसार मुल्ला, स्थानिक नागरिक योगेश अस्वले, वैशाली कणसे, सायरा पाटगावकर,सचिन संकपाळ, ओंकार रजपूत,सुनीता रजपूत,वरद अस्वले, बाळासाहेब गवंडी, संगमलाल यादव, विश्वंभर कदम,राम केवल, सहानी रामलाल यादव,राम केवल सहानी, संतोष भोसले ,आदींसह इतर नागरिक उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: